बॉलिवूडमधून अचानक गायब झाला ‘मेला’मधील गुज्जर; आता जगतो असे आयुष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 21:46 IST
२००० साली आलेल्या आमिर खानच्या ‘मेला’ या चित्रपटातील गुज्जर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. चित्रपटात गुज्जर या नावाने एका गावात ...
बॉलिवूडमधून अचानक गायब झाला ‘मेला’मधील गुज्जर; आता जगतो असे आयुष्य!
२००० साली आलेल्या आमिर खानच्या ‘मेला’ या चित्रपटातील गुज्जर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. चित्रपटात गुज्जर या नावाने एका गावात दहशत पसरविणाºया या खलनायकाने प्रेक्षकांच्या मनातही धडकी भरविली होती. १८ वर्षांनंतर हा खलनायक आज कसा दिसतो हे कोणालाच माहीत नाही. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहोत. होय, चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारूनही आमिर खानवर भारी पडलेला अभिनेता टीनू वर्मा रातोरात स्टार बनला. त्याने १९९३ मध्ये आलेल्या ‘आंखे’ या सुपरहिट चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र टीनूला खरी ओळख ‘मेला’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स आॅफिसवर जबरदस्त धूम उडवून दिली होती. हा चित्रपट २१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध करण्यात आला होता. टीनूच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास त्याने, ‘राजा हिंदुस्तानी, शोला और शबनम, गदर, बाज और गुलामी’ आदी चित्रपटांमध्ये आपले खलनायकी रूप दाखविले होते. मात्र अशातही टीनूला बॉलिवूडमधील कामात सातत्य ठेवता आले नाही. त्याला काम मिळणे बंद झाले. त्यानंतर त्याने आपल्या परिवारासमवेत वेळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. टीनू एक अभिनेता असण्याबरोबरच स्टंटमॅनही आहे. त्याला बेस्ट अॅक्शनसाठी फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला आहे. तसेच त्याने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. त्याचबरोबर त्याने दिग्दर्शक म्हणूनही नशीब आजमाविले आहे. टीनूने ‘मां तुझे सलाम, बाज, राजा ठाकूर, दिस वीकेंड आणि गुलामी’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.