Join us  

Urvashi Rautela: "आज रात्री फक्त मेणबत्त्याच पेटवल्या जात नाहीत...", उर्वशी रौतेलाचा घायाळ करणारा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 8:22 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. खरं तर ती आजकाल तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते.
2 / 10
अभिनेत्री उर्वशी आजकाल चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जिथे ती तिच्या चाहत्यांना प्रत्येक क्षणाचे अपडेट देत असते. दरम्यान, उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर अशी एक पोस्ट शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
3 / 10
खरं तर उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने बोल्ड लूक दाखवला आहे. उर्वशी रौतेलाचा 25 फेब्रुवारीला वाढदिवस आहे.
4 / 10
तिने वाढदिवसाच्या एक दिवस आधी एक फोटो शेअर केला आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी तिच्या इंस्टाग्रामवर एक अतिशय बोल्ड फोटो पोस्ट केला आहे.
5 / 10
तिचा हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्संना पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतची आठवण झाली आहे. शनिवारी उर्वशीचा 29 वा वाढदिवस आहे.
6 / 10
उर्वशीने शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्वशी सोनेरी रंगाच्या शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.
7 / 10
हा फोटो शेअर करण्यासोबतच उर्वशी रौतेलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमची बर्थडे गर्ल.' उर्वशीने पुढे लिहिले की, 'आज रात्री फक्त मेणबत्त्याच पेटवल्या जात नाहीत.' या कॅप्शनसह तिने आगीचा इमोजी देखील शेअर केला आहे. उर्वशी रौतेलाच्या या फोटोला काही तासांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत.
8 / 10
यासोबतच युजर्स उर्वशीच्या या पोस्टवर जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटच्या माध्यमातून म्हटले की, 'आज भाऊ ऋषभ पंतचा वाढदिवस आहे का.'
9 / 10
दुसर्‍या युजरने लिहिले की, 'ऋषभ पंत आता धोक्याबाहेर आहे, पण दुसरा कोणीतरी धोक्यात आहे.'
10 / 10
लक्षणीय बाब म्हणजे काही नेटकऱ्यांनी तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहसोबत उर्वशीचे नाव जोडले आहे. खरं तर उर्वशीचे नाव सतत ऋषभ पंत आणि नसीम शाहसोबत जोडले जाते.
टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतव्हायरल फोटोज्दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट