बॉलिवूडमधील फेमस टिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आजवर त्यांच्या चित्रपटात शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. जाणून घेऊया कोण आहेत... बॉलिवूडमधील फेमस टिचर्स...
बॉलिवूडमधील फेमस टिचर्स
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आजवर त्यांच्या चित्रपटात शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. जाणून घेऊया कोण आहेत... बॉलिवूडमधील फेमस टिचर्स... बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आजवर त्यांच्या चित्रपटात शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. जाणून घेऊया कोण आहेत... बॉलिवूडमधील फेमस टिचर्स... मोहोब्बते या चित्रपटात शाहरुख खानने राज आर्यन ही भूमिका साकारली होती. ब्लॅक चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेला शिक्षक प्रेक्षकांना चांगला भावला होता. पाठशाला या चित्रपटात शाहिद कपूरने एका कूल टिचरची भूमिका साकारली होती. सुश्मिता सेनने मैं हूँ ना या चित्रपटात साकारलेली स्टायलिश टिचर आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. सर या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी नसिरुद्धीन शहा यांनी साकारलेली टिचरची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजी आहे. थ्री इडियट मध्ये बोमन इराणी यांनी साकारलेल्या टिचरच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कुछ कुछ होता है या चित्रपटात अनुपम खेर यांनी प्रिन्सिपलची भूमिका साकारली होती. या प्रिन्सिपलच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील राग आल्यावर खळखळून हसणाऱ्या अस्थाना या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मन जिंकली होती. अस्थाना हा मेडिकल कॉलेजचा डिन दाखवला असून ही व्यक्तिरेखा बोनम इराणी यांनी खूपच चांगल्याप्रकारे साकारली होती. कुछ कुछ होता है या चित्रपटातील स्टायलिश, खेळकर टिचर प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही व्यक्तिरेखा अर्चना पुरण सिंगने साकारली होती. मैं हूँ ना या चित्रपटात बोलताना थुंकी उडवणाऱ्या सतिश शहाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या चित्रपटात तो शिक्षकाच्या भूमिकेत झळकला होता. मुलांना कोणत्या गोष्टीत रस आहे त्याच गोष्टीत त्यांना प्रोत्साहन द्या असा खूप चांगला संदेश एक शिक्षक बनून आमिर खानने तारे जमीन पर या चित्रपटात दिला आहे.