Join us  

OMG!! श्रीकांत तिवारीच्या ‘लेकी’ची डिमांड वाढली, चाहत्यांकडून थेट लग्नाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 6:00 AM

1 / 8
अलीकडे रिलीज झालेली ‘द फॅमिली मॅन 2’ ही सीरिज प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. या सीरिजमधील एक चेहरा सध्या जाम चर्चेत आहे.
2 / 8
होय, आम्ही बोलतोय ते सीरिजमधील श्रीकांत तिवारीची मुलगी धृति हिच्याबद्दल. अश्लेषा ठाकूर हिने ही धृतिची भूमिका साकारली आहे.
3 / 8
अश्लेषाने ज्या पद्धतीने धृतिची भूमिका जिवंत केली, ते पाहून चाहते अक्षरश: तिच्या प्रेमात पडले आहेत. केवळ प्रेमात नाही तर तिच्यासाठी वेडे झाले आहेत.
4 / 8
दुस-या सीझननंतर धृति इतकी लोकप्रिय झाली की, आता सोशल मीडियावर तिला लग्नासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत.
5 / 8
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द अश्लेषाने याबाबत सांगितले. ‘अनेक जण तिला डायरेक्ट मेसेज करून लग्नासाठी विचारत आहेत. तर काही जण चित्रविचित्र मॅसेज करत आहेत,’ असं ती म्हणाली.
6 / 8
द फॅमिली मॅनच्या पहिल्या सीझनमध्येही अश्लेषा होती. पण तिची भूमिका फार मोठी नव्हती. दुस-या सीझनमध्ये मात्र पहिल्या सीझनपेक्षा अधिक जबरदस्त होता.
7 / 8
दुस-या सीझनमध्ये अश्लेषाने एक किसींग सीनही दिला. या सीनवेळी मीखूपच नर्वस होते. कारण माझ्यासाठी हे नवीन होतं. मला माझ्या भूमिकेत मॅच्युरिटी आणायची होती. यासाठी मी खूप रोमॅण्टिक वेब सीरिज पाहिल्या आणि हा सीन दिला, असे तिने सांगितले.
8 / 8
अश्लेषा याआधी अनेक जाहिरातीत दिसली आहे. 2017 साली ‘शक्ती’ या मालिकेतून तिने अभिनयास सुरूवात केली. त्यानंतर ‘जीना इसीका नाम है’ या सिनेमातही ती दिसली.
टॅग्स :मनोज वाजपेयी