Join us  

२१ वर्षांमध्ये इतकी बदलली 'धडकन'फेम महिमा चौधरी; आता दिसते आधीपेक्षा जास्त सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:42 PM

1 / 8
'धडकन', 'परदेस', 'लज्जा', 'LOC कारगील' अशा किती तरी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी.
2 / 8
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.
3 / 8
महिमाने आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, धडकन चित्रपटातील तिची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.
4 / 8
'धडकन'मध्ये महिमाने शीतल ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या लूकचीही प्रचंड चर्चा झाली होती.
5 / 8
धडकन या चित्रपटाला जवळपास २१ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून केला आहे. विशेष म्हणजे या २१ वर्षात महिमामध्ये कमालीचा बदल झाला आहे.
6 / 8
महिमा आता पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस दिसू लागली आहे. महिमा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.
7 / 8
महिमाचं खरं नाव ऋतू चौधरी आहे. परंतु, कलाविश्वात येण्यापूर्वी तिने तिचं नाव बदललं.
8 / 8
'दिल है तुम्हारा', 'ओम जय जगदीश', 'तेरे नाम', 'बागबान' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
टॅग्स :महिमा चौधरीबॉलिवूडसेलिब्रिटी