Join us

‘ट्रिपल एक्स’ टीमसोबत दीपिकाची अ‍ॅक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 09:38 IST

 दीपिका पदुकोन ही सध्या तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ मुळे चर्चेत आहे. विन डिजेलसोबत ...

 दीपिका पदुकोन ही सध्या तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ मुळे चर्चेत आहे. विन डिजेलसोबत ती चित्रपटाची शूटींग करत आहे. डिप्पी सातत्याने तिच्या चित्रपटातील अपडेट्स आणि फोटो, स्टील सोशल मीडियावर अपलोड करत असते.तिच्या चाहत्यांना चित्रपटाविषयी वेळोवेळी अपडेट्स देत असते. तिने काही फोटो नुकतेच अपलोड केले आहेत, त्यात ती ट्रिपल एक्सच्या टिमसोबत अ‍ॅक्शन सिक्वेन्स सीन्स शूट करत आहे. यावेळी दीपिका, विन, रूबी रोज आणि क्रिस वु हे दिसत आहे.‘कार चेस सिक्वेन्स’ वेळी ब्रिजवर हे सीन्स शूट करण्यात आले आहेत. दीपिका नेहमीप्रमाणेच अत्यंत स्टनिंग आणि हॉट दिसत आहे. तुम्हाला कितीही दीपिकाला किक आणि पंच मारताना पहावयाचे असेल तरीही तुम्हाला थोडंसं वाट पहावं लागेल.कारण चित्रपट २० जानेवारी २०१७ ला रिलीज होणार आहे.