Join us  

IN PICS : डर ते साजन...! आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 4:03 PM

1 / 11
बजरंगी भाईजान- ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा सर्वप्रथम आमिर खानला ऑफर झाला होता. मात्र त्याला सिनेमात काही बदल हवे होते. ज्याला दिग्दर्शक तयार नव्हता. आमिरने नकार दिल्यानंतर या सिनेमासाठी लगेच सलमान खानचे नाव फायनल करण्यात आले होते.
2 / 11
डर- 1993 साली रिलीज झालेल्या या सिनेमासाठी सर्वप्रथम अजय देवगणला विचारणा झाली होती. त्याने नकार दिल्यामुळे यासाठी आमिर खानची निवड करण्यात आली होती. मात्र त्यानेही नकार दिला आणि नंतर कुठे हा सिनेमा शाहरूख खानला मिळाला.
3 / 11
दिल तो पागल हे- सुरुवातीला आमिर खान यालाच हा सिनेमा ऑफर झाला होता. पण आमिरने यास नकार दिला होता. मग हा सिनेमा शाहरूखच्या झोळीत पडला.
4 / 11
दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे - ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण हा सिनेमाही सर्वप्रथम आमिर खानला ऑफर झाला होता. पण त्याने ही ऑफर नाकारली. याचवर्षी आमिरचा रंगीला हा सिनेमा रिलीज झाला होता.
5 / 11
हम आपके है कौन - स्क्रिप्ट आवडली नसल्याचे कारण देत आमिरने हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. नंतर हा सिनेमा सलमान खानला मिळाला होता.
6 / 11
जोश - या चित्रपटातील प्रकाशची भूमिका आमिरला ऑफर झाली होती. मात्र शाहरूखच्या मॅक्स या भूमिकेच्या तुलनेत ही भूमिका लहान वाटल्याने आमिरने हा सिनेमा करण्यास नकार दिला होता.
7 / 11
मोहब्बतें - मोहब्बतें या सिनेमात राज आर्यनची भूमिका आमिर खानला ऑफर झाली होती. त्याने नकार दिल्यावर शाहरूखने हा सिनेमा केला होता.
8 / 11
स्वदेश - आशुतोष गोवारीकरने लगान या सिनेमात आमिरसोबत काम केले होते. यानंतर आशुतोषने आपल्या स्वदेश या सिनेमासाठीही आमिरला विचारणा केली होती. आमिरने नकार दिल्यामुळे ही भूमिका शाहरूखच्या झोळीत पडली होती.
9 / 11
साजन - सलमान व संजय दत्तचा साजन या सुपरडुपर हिट सिनेमासाठीही सर्वप्रथम आमिरला विचारणा झाली होती. मात्र मी या भूमिकेत फिट बसत नाही, असे सांगून आमिरने हा सिनेमा करण्यास नकार दिला होता.
10 / 11
नायक- अनिल कपूरचा हा सिनेमाही सर्वप्रथम आमिरला ऑफर झाला होता. त्याने नकार दिल्यावर ही भूमिका अनिल कपूर यांना मिळाली होती.
11 / 11
1942: अ लव्ह स्टोरी - विधू विनोद चोप्रांचा हा रोमॅन्टिक सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. विधु विनोद चोप्रा यात आमिरला घेऊ इच्छित होते. आमिरला समोर ठेवूनच त्यांनी लीड रोलची भूमिका लिहिली होती.
टॅग्स :आमिर खान