Join us  

Chitrashi Rawat Wedding: ‘चक दे’ गर्ल चित्राशी रावतच्या लग्नाचे फोटो व्हायरल, पाहा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 12:57 PM

1 / 11
‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटात कोमल चौटेलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री चित्राशी रावत (Chitrashi Rawat) नुकतीच लग्नबंधनात अडकली.
2 / 11
तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चित्राशीने प्रियकर ध्रुवदित्य भगनानीसोबत आपली लग्नगाठ बांधली.
3 / 11
बिलासपूर येथे चित्राशीचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी ध्रुवदित्यने चित्राशीच्या माथ्याचं असं चुंबन घेतलं.
4 / 11
‘चक दे इंडिया’त दिसलेली विद्या माळवदे चित्राशीच्या लग्नाला हजर होती. तिने चित्राशीच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 11
चित्राशी व विद्या माळवदे दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. चित्राशीच्या लग्नाला विद्याने आवर्जुन हजेरी लावली.
6 / 11
चित्राशीला अगदी साधेपणानं लग्न साधेपणानं करायचं होतं. कोर्ट मॅरेज करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र घरच्यांच्या आग्रहामुळे चित्राशी आणि ध्रुवदित्यच्या लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
7 / 11
लग्नावर खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून तिला संपूर्ण जग फिरायचं होतं, असं चित्राशीनं मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं.
8 / 11
चित्राशी व ध्रुवदित्य गेल्या ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची पहिली भेट 'प्रेमामयी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
9 / 11
या चित्रपटात तो तिच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात काम करताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
10 / 11
ती 'चक दे इंडिया' व्यतिरिक्त ​​'चित्राशी रावत को फॅशन', 'तेरे नाल लव हो गया' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती.
11 / 11
ध्रुवदित्य हा एक अभिनेता आहे ज्याने 'फ्लाइट', 'द ग्रे' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच तो हंगामा प्ले वेब सीरिज 'डॅमेज्ड'मध्येही काम करताना दिसला आहे.
टॅग्स :शाहरुख खानविद्या माळवदेबॉलिवूडसेलिब्रिटी