Join us  

Bollywood Villains: हे आहेत बॉलिवूडमधील लोकप्रिय व्हिलन, त्यांच्या एन्ट्रीनंच लोकांना फुटायचा घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 8:00 AM

1 / 7
प्रेम चोप्रा - प्रेम चोप्रा हे नाव ऐकताच प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची काळजी वाटायची. त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप उमटविली आहे.
2 / 7
शक्ती कपूर- शक्ती कपूर यांनी साकारलेले क्राइम मास्टर गोगो हे पात्र खलनायकाच्या प्रतिष्ठित पात्रांपैकी एक आहे.
3 / 7
अमरीश पुरी - मोगॅम्बो खुश हुआ...... हा डायलॉग आजही अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतो. अमरीश पुरी यांनी मिस्टर इंडिया चित्रपटात मोगॅम्बो बनून सर्वांच्या मनात भीती निर्माण केली होती.
4 / 7
अमजद खान - शोलेतील गब्बर हा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला खलनायक आहे. गब्बरशिवाय या चित्रपटाचा कोणीही विचार करू शकत नाही. या चित्रपटात गब्बरची भूमिका अमजद खान यांनी केली होती.
5 / 7
रंजीत - रंजीत यांना कोणत्याही खलनायकाच्या नावाची गरज नव्हती, त्यांनी साकारलेली प्रत्येक पात्र खलनायकाचीच होती.
6 / 7
कुलभूषण खरबंदा - शान चित्रपटातील या शाकालची व्यक्तिरेखा कुलभूषण खरबंदा यांनी साकारली होती. डोक्यावर बोटे ठेवून तबला वाजवण्याची शैली सगळ्यांच्या चांगलीच लक्षात आहे.
7 / 7
गुलशन ग्रोव्हर - राम लखन या चित्रपटातील बॅड मॅनची भूमिका बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक गुलशन ग्रोव्हर यांनी साकारली होती. त्यांच्या लुकसह त्यांचा प्रत्येक डायलॉग बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
टॅग्स :प्रेम चोपडागुलशन ग्रोव्हरअमजद खान