Join us

बॉलिवूडच्या सुपरहिट मॉमच्या मुलींचे करिअर ठरले फ्लॉप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 17:53 IST

आई-मुलीचे नातं जे जगातले सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक आहे. प्रत्येक आईला असे वाटत असते आपल्या मुलींनी भविष्यात आपल्यापेक्षा पुढे ...

आई-मुलीचे नातं जे जगातले सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक आहे. प्रत्येक आईला असे वाटत असते आपल्या मुलींनी भविष्यात आपल्यापेक्षा पुढे जावे. बॉलिवूडमधील आई असलेल्या अभिनेत्री याला अपवाद नाहीत. आपल्या मुलीने अभिनय क्षेत्रात आपल्यापेक्षा मोठी झेप घ्यावी असे त्यांना वाटणे साहजिकच आहे. मात्र काही गाजलेल्या अभिनेत्रींच्या मुलींना म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. बॉलिवूडमधील अशाच काही माय-लेकींच्या जोडीवर टाकूया एक नजर.. डिंपल कपाडिया आणि ट्विंकल खन्ना डिंपल खन्ना यांनी नुकतेच वयाच्या 60 व्या वर्षात पदार्पण केले. डिंपल यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठवले. पदार्पणातच त्यांना बॉबी चित्रपटासाठी फिल्म फेअरचे अॅवॉर्ड मिळाले. मात्र त्यानंतरचा बराचकाळ त्या चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. 80 च्या दशकात त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. रुदाली चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. आई प्रमाणे ट्विंकलला यश मिळवता आले नाही. 1995 साली आलेल्या बरसात या चित्रपटातून तिने एंट्री केली. ट्विंकलने बॉलिवूडमध्ये तिन्ही खानसोबत देखील काम केले आहे. मात्र तरीही हवे तसे यश तिला मिळवता आले नाही. त्यानंतर मात्र अक्षय कुमारसोबत लग्न करुन ट्विंकलने संसारात रमण्याचा निर्णय घेतला.         हेमा मालिनी- ईशा देआल बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी. हेमा मालिनी या अभिनयसोबतच राजकारणात ही सक्रिय आहेत.  त्यांना नृत्यासोबतच अभिनयात देखील नैपुण्य मिळवले आहे. सपनों का सौदागर' याचित्रपटाच्या माध्यमातून त्यांची या झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवले. गीता और सीता या चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. मात्र हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल हीचे करिअर मात्र फ्लॉप राहिले. अभिनयाचा वारसा ईशाला आईकडूनच मिळाले असे असूनही त्याचा फारसा फायदा तिला करुन घेता आला नाही. 2002 मध्ये आलेला ईशाचा पहिला चित्रपट 'कोई मेरे दिल से पूछे' बॉक्स ऑफिसवर आपटला. ना तुम जानो ना हम, एल ओ सी कारगिल, क्या दिल ने कहा, कुछ तो है यासारख्या चित्रपटात ईशाच्या वाटेला आले मात्र ते ही तिला यश मिळवून देऊ शकले नाही. तनुजा- तनिषा तनुजा यांनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रित पाऊल ठेवले. तनुजा यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. छबीली हा त्यांचा अभिनेत्री म्हणून काम केलेला पहिला चित्रपट. मात्र त्यांना खरी प्रसिद्ध दिली ती 'हमारी याद आएगी' याचित्रपटातने. त्यांनी अनेक बंगाली चित्रपटात देखील काम केले. तनुजा यांना दोन मुली काजोल आणि तनिषा. काजोल  काजोल आज बॉलिवूडच्या टॉप टेन अभिनेत्रींमध्य सामील आहे तर तनुजा अजूनही स्ट्रगल करते आहे. यशराज बॅनरच्या नील एन निक्की सारखे चित्रपटही तिला यश मिळवून देऊ शकले नाही. तनिषाला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट मिळाले. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायबच झाली.   शर्मिला टागोर -सोहा अली खानबॉलिवूडमधले एकपेक्षा एक चित्रपट सुपरहिट चित्रपट शर्मिला टागोर यांच्या नावावर आहेत. एक सशक्त अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटातून त्यांना आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.  आराधना, सफर, अमर प्रेम, छोटी बहू, यासारखे अनेक हिट चित्रपटात त्यांनी काम केले आहे. सोहा अली खान हिने शाहिद कपूरच्या अपोझिट दिल मांगे मोर या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर ती दिसली रंग दे बसंती या मल्टीस्टारर चित्रपटात दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली मात्र त्याचा सोहाच्या करिअरचा ग्राफ काही वर जाऊ शकला नाही. सोहा आजही सुपरहिट चित्रपटाची वाट बघते आहे.