Join us  

स्क्रिप्ट वाचून बॉलिवूड कलाकार भारावले; 'कुणी ११ तर काहींनी १ रुपयांत' काम केले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 3:51 PM

1 / 4
'नवाजुद्दिकीन सिद्दिकी'ची चित्रपटांची निवड आणि त्याचा अभिनय याला तोडच नाही. त्याने टॅलेंट आणि मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवाजने अनेक चित्रपट केले आणि त्याची फीसही घेतली पण 'मंटो' हा सिनेमा त्याच्यासाठी खुपच खास आहे. या चित्रपटासाठी त्याने केवळ '१ रुपया' मानधन घेतले आहे.
2 / 4
आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारा अभिनेता 'शाहिद कपुर'. शाहिदने कमीने, कबीर सिंग असे अनेक हिट चित्रपट दिले. तर हैदर चित्रपटातील अभिनयातुन शाहिदने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शाहिदसाठीही 'हैदर' तितकाच विशेष आहे आणि यासाठी त्याने एकही रुपया घेतलेला नाही.
3 / 4
बॉलिवुडची सध्याची आघाडीची आणि सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजे 'दीपिका पदुकोण'. खुप कमी जणांना माहित असेल की दीपिका ने तिचा पहिला चित्रपट 'ओम शांती ओम' साठी एकही पैसा घेतला नाही.
4 / 4
नुकतीच आई झालेली अभिनेत्री 'सोनम कपुर' बॉलिवुडमध्ये फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. तर दुसरीकडे तिने 'भाग मिल्खा भाग' या सिनेमात गावातल्या सरळ साध्या मुलीची भुमिका साकारली आहे. या भुमिकेसाठी तिने केवळ '११ रुपये' मानधन घेतले आहे.
टॅग्स :हिंदीनवाझुद्दीन सिद्दीकीशाहिद कपूरदीपिका पादुकोणसोनम कपूर