Join us  

१४ वर्षांचा संसार अन् पदरात दोन मुलं; घटस्फोटानंतर आता १२ वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करतोय बॉलिवूड अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:40 PM

1 / 8
आशियातील 'Most Sexy Man' ते बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळख असलेला अभिनेता म्हणजे ह्रतिक रोशन. दमदार अभिनय आणि उत्कृष्ट नृत्य कौशल्याच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनात आपलं स्थान अढळ केलं आहे.
2 / 8
आज या अभिनेत्याने वयाची पन्नाशी गाठली आहे. फिट अ‍ॅंड हॅंडसम हंक ह्रतिक रोशन त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करतोय, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
3 / 8
१० जानेवारी १९७४ मध्ये ह्रतिर रोशनचा जन्म झाला. अभिनेता ह्रतिक रोशन मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. त्याच्या पर्सनल लाईफमुळे हा अभिनेता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या काही दिवसांपासून ह्रतिक रोशन सबा आझादाला डेट करत असल्याची; चर्चा वाऱ्यासारखी पसरत आहे.
4 / 8
ह्रतिकने पत्नी सुझैन खानला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता सबा आझादच्या प्रेमात पडला. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
5 / 8
दरम्यान, आपल्या नात्याला दुजोरा ह्रतिक रोशनने हे नातं सर्वांसमोर स्वीकारले आहे. पेशाने गायिका असलेल्या सबा आझादच्या प्रेमात ह्रतिक पडला. १२ वर्षांनी लहान असलेल्या सबा आझादसोबत ह्रतिकचे नाव जोडले जात आहे.
6 / 8
अभिनेता ह्रतिक रोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी गर्लफ्रेंडसोबतच फोटो शेअर करुन नात्यातील बॉन्डिंग दाखवून देत असतो.
7 / 8
२० डिसेंबर २००० मध्ये अभिनेता ह्रतिक रोशनने सुझैन खानसोबत विवाहबद्ध झाला होता. १४ वर्षांच्या संसारानंतर काही वैयक्तिक कारणामुळे हे दोघे वेगळे झाले.
8 / 8
ह्रतिक रोशन आणि सुझैन खान यांची दोन मुले आहेत. या दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम देत ते दोघंही त्यांच्या पद्धतीनं जीवन जगतायेत.
टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूड