Join us  

PICS: सोनम कपूर व आनंद आहुजाची गजब प्रेमकहाणी; मित्राचे प्रपोजल घेऊन गेला अन् स्वत:च प्रेमात पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 2:32 PM

1 / 10
सोनम व आनंदची लव्हस्टोरी अफलातून आहे. खरे तर आनंद त्याच्या एका मित्रासोबत सोनमला डेटवर पाठवू इच्छित होता. त्यानिमित्तानेच दोघांची भेट झाली होती.
2 / 10
पण सोनमला पाहताच आनंद आपल्या मित्राला विसरला आणि स्वत:च सोनमच्या प्रेमात बुडाला.
3 / 10
2014 मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेण्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे.
4 / 10
पहिल्या भेटीनंतर सोनम व आनंद एकमेकांच्या आणखी जवळ आलेत. रात्ररात्र दोघांच्या गप्पा सुरु झाल्यात.
5 / 10
महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले मे 2018 मध्ये दोघांनीही लग्न केले.
6 / 10
आनंद व सोनमने एकमेकांना डेट करणे सुरु केले, त्या दिवसांपासून बरोबर दोन महिन्यांनी सोनमचा वाढदिवस होता.
7 / 10
सोनमच्या वाढदिवसासाठी आनंदने एक सरप्राईज प्लान केले. त्याने एक रेस्टॉरंट बुक केले आणि सोनमच्या आवडीचा मेन्यू, म्युझिक अशी सगळी जंगी तयारी केली.
8 / 10
सोनम रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आनंदने तिला त्याने हाताने लिहिलेले एक कार्ड गिफ्ट केले. सोनमसाठी हे सरप्राईज अविस्मरणीय ठरले. कारण यापूर्वी कुणीही कधीही तिच्यासाठी असे काही केले नव्हते.
9 / 10
आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे.
10 / 10
आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे.
टॅग्स :सोनम कपूर