Join us  

IN PICS : शांती ते क्रिकेटच्या मैदानावरची होस्ट...! इतक्या वर्षांत इतकी बदलली मंदिरा बेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:57 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ( (Mandira Bedi ) हिचा आज वाढदिवस. 15 एप्रिल 1972 रोजी जन्मलेली मंदिरा फिल्म इंडस्ट्रीत आली तेव्हा एक साधीभोळी मुलगी होती. आज तिला पाहून कुणीही थक्क होईल. (Mandira Bedi transformation)
2 / 10
वयासोबत तिचे सौंदर्य वाढतेय. फिटनेसच्या बाबतीत तर ती बॉलिवूडच्या बड्या बड्या अभिनेत्रींना टक्कर देते.
3 / 10
छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मंदिरा आज पुरती बदलली आहे.
4 / 10
1994 साली दूरदर्शनवरील ‘शांती’ या मालिकेतून मंदिराने करिअरला सुरुवात केली.
5 / 10
शांती या मालिकेनंतर आहट, औरत, घर जमाई, क्योंकि सास भी कभी बहू थी अशा लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली.
6 / 10
पुढे क्रिकेटच्या फिल्डवर तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. क्रिकेटचे बारकावे समजावणा-या मंदिराचा तो अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.
7 / 10
क्रिकेटच्या मैदानातील टीव्ही प्रेजेंटर म्हणून तिने काम केले. यावेळच्या तिच्या साड्यांची प्रचंड चर्चा रंगली होती.
8 / 10
फिगर मेंटेन ठेवण्यासाठी मंदिरा प्रचंड मेहनत घेते. अगदी लग्नानंतर 12 वर्षे यामुळेच तिने मुलं होऊ दिले नाही.
9 / 10
मुलं झाल्याने करिअर संपेल, अशी भीती तिला होती. वयाच्या 39 व्या वर्षी मंदिराने मुलाला जन्म दिला.
10 / 10
गतवर्षी जुलै महिन्यात तिने एका मुलीला दत्तक घेतले.
टॅग्स :मंदिरा बेदी