Join us  

फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाहीये 'संजू बाबा'चे आयुष्य, पाहा त्याचे कधीही न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 4:48 PM

1 / 13
बॉलिवूडचा मुन्नाभाई (Munna bhai) अशी ओळख असलेला संजय दत्त (Sanjay Dutt) आज वाढदिवस साजरा करत आहे.
2 / 13
सुनील दत्त (sunil dutt) आणि नर्गिस यांचा मुलगा संजय दत्तचे आयुष्य एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाही.
3 / 13
संजय दत्तने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरूवातीलाच वडिलांच्या बॅनरखालचा सिनेमा रेशमा और शेरा या सिनेमातून संजयने आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
4 / 13
1981 मध्ये संजयची आई नर्गिस यांचे निधन झाले. आईच्या निधनामुळे संजय पूर्णपणे कोसळला. याचदरम्यान त्याला चुकीची संगत लाभलीआणि मिळालेल्या यशाने हुरळून जात तो ड्रग्सच्या अधीन गेला.
5 / 13
सुनील दत्त यांनी संजयची नशा सोडवण्यासाठी त्याला उपचारासाठी अमेरिकेत पाठवले होते. दीर्घकाळाच्या उपचारानंतर संजयने ड्रग्स घेणे सोडले आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
6 / 13
संजयसाठी 1993 हे वर्ष फार कठीण होते. 1993मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात संजयने हत्यारे बाळगल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आले.
7 / 13
त्यावेळी संजय दत्त मॉरिशसमध्ये आतिश सिनेमाचे शूटिंग करत होता. जेव्हा तो मुंबई एअरपोर्टला पोहोचला तेव्हा त्याला चौकशीसाठी तेथूनच अटक करण्यात आली.
8 / 13
या प्रकणात संजयला काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला. एक वर्ष जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा 1994 च्या जुलैमध्ये संजयला तुरुंगात जावं लागलं.
9 / 13
यावेळी थेट अंडासेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. कुख्यात गुंड, भयंकर आरोपींना ज्या ठिकाणी ठेवलं जातं तीच ही जागा.
10 / 13
तब्बल 15 महिने तुरुंगाची हवा खाल्यानंतर संजयला दिलासा मिळाला. ऑक्टोबर 1995 मध्ये त्याची सुटका झाली.
11 / 13
पण 1993 सालच्या चुका संजयचा पिच्छा सोडायला तयार नव्हत्या. 2006 साली मुन्नाभाईला बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी शिक्षा होणं अद्याप बाकी होतं.
12 / 13
2007 साली टाडा न्यायालयानं संजय दत्त दहशतवादी नसल्याचा निर्वाळा दिला, मात्र त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. संजय तुरुंगात गेला मात्र लवकरच जामिनावर सुटला.
13 / 13
2013 साली सुप्रीम कोर्टाने संजयच्या शिक्षेत घट करत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मे 2013 मध्ये संजय तुरुंगात गेला आणि फेब्रुवारी 2016 मध्ये चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर त्याची तुरुंगातून लवकर सुटका होणार असल्याची बातमी आली.
टॅग्स :संजय दत्त