बिग बीं नी शेअर केले नातीचे फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 09:16 IST
बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे त्यांची मुलगी श्वेता नंदाच्या मुलीबद्दल फारच सतर्क आहेत. तिचे शिक्षण, तिच्या आवडीनिवडी, ...
बिग बीं नी शेअर केले नातीचे फोटो!
बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे त्यांची मुलगी श्वेता नंदाच्या मुलीबद्दल फारच सतर्क आहेत. तिचे शिक्षण, तिच्या आवडीनिवडी, तिचे मित्रमैत्रिणी याबद्दल ते फार लक्ष ठेवून असतात. ती नुकतीच केंट येथील तिच्या सेव्हेनॉक्स शाळेतून ग्रॅज्युएट झाली.तिच्या ‘ग्रॅज्युएशन डे’ चे काही फोटो सोशल मीडियावर आजोबा बिग बी यांनी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे ग्रॅज्युएशनचे काही फोटो, इंग्लंड येथील शाहरूखचा मुलगा आर्यनसोबतचे काही फोटो, तसेच तिच्या काही क्लासमेट्ससोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहेत.