Join us  

ब्रालेस आऊटफिटमध्ये फॅशन करायला गेली, पण...; भूमी पेडणेकरचे बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 9:39 AM

1 / 8
भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. दम लगा के हैशा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती दिसली.
2 / 8
अभिनयाबरोबर सध्या भूमीच्या हॉटनेसची चर्चा रंगली आहे. भूमीने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.
3 / 8
या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. पांढऱ्या रंगाचे डिझायनर जॅकेट आणि पँट परिधान करत भूमीने फोटोशूट केलं आहे.
4 / 8
या ब्रालेस फोटोशूटमध्ये भूमीने तिची फिगर फ्लॉन्ट केल्याचं पाहायला मिळत आहे.
5 / 8
भूमीचं हे ब्रालेस फोटोशूट पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. काहींनी भूमीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे.
6 / 8
'हिला पण चित्रपट मिळत नाहीयेत वाटतं', 'तुम्ही बॉलिवूडच्या हिरोईन काहीही कसं घालता', 'तू या आऊटफिटमध्ये चांगली दिसत नाहीस' अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
7 / 8
भूमीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
8 / 8
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तर सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.
टॅग्स :भूमी पेडणेकर सेलिब्रिटी