Join us  

सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 1:02 PM

1 / 10
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. आज आम्ही तुम्हाला त्या स्टार्सबद्दल सांगणार आहोत ज्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या यादीत राजू श्रीवास्तवपासून श्रीदेवीपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.
2 / 10
'रावण'ची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे २०२१ साली निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्या मृत्यूचे कारण हृद्यविकार असे सांगण्यात आले आहे.
3 / 10
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक केके यांचे एका कार्यक्रमादरम्यान निधन झाले. गायक केके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.
4 / 10
२०१७ मध्ये ओम पुरी यांचे निधन झाले. ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
5 / 10
सलमान खानच्या बिग बॉस शोचा विजेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या ४० व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
6 / 10
प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रीमा लागू यांनी २०१७ मध्ये जगाचा निरोप घेतला.
7 / 10
श्रीदेवीच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने श्रीदेवीचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले.
8 / 10
बॉलिवूडपासून टीव्ही जगतामध्ये आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारे राजू श्रीवास्तव यांचे २०२२ मध्ये निधन झाले. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
9 / 10
फारुख शेख यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. फारुख शेख यांचे २०१३ साली निधन झाले. फारुख शेख यांचा मृत्यूही हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.
10 / 10
अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
टॅग्स :सतीश कौशिकश्रीदेवीसिद्धार्थ शुक्लाकेके कृष्णकुमार कुन्नथराजू श्रीवास्तवरिमा लागूओम पुरी