Join us  

Aryan Khan Drugs Case : जेल अधिकाऱ्यांना शाहरुख खाननं विचारलं, मुलाला घरचं अन्न देऊ शकतो? मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 4:10 PM

1 / 8
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे कुटुंब सध्या प्रचंड तणावाखाली आहे. कारण, 'मन्नत'चा राजकुमार सध्या तुरुंगात आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात अडकल्याने जवळपास गेल्या 17-18 दिवसांपासून कारागृहात आहे. तो कारागृहात अस्वस्थ असल्याचेही बोलले जात आहे. गुरुवारी सकाळी शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली.
2 / 8
यापूर्वी शाहरुख आणि गौरी खान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने आर्यनशी संवाद साधला होता. महाराष्ट्रात कोरोना प्रोटोकॉलमुळे, कैदी कुटुंबीयांना समोरासमोर भेटू शकत नव्हते. परंतु 21 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या गाइडलाईनमध्ये सवलत देण्यात आली आहे.
3 / 8
कारागृहात कैत्यांना कसे भेटता येणार? - आता, कुटुंबातील सदस्य, नातलग आणि वकील आर्थर रोड कारागृहात जाऊन कैद्यांना भेटू शकतात. नातलग/वकील यांना भेटण्यासाठी आधी तुरुंग अधिकाऱ्यांना कळवावे लागेल. यानंतर, तुरुंग अधिकारी भेटण्याची वेळ देतील.
4 / 8
कारागृहातील कैद्याला भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला आपले आधार कार्ड तुरुंग अधिकाऱ्याकडे जमा करावे लागेल. तपशील नोंदविला जाईल. नातेवाईक/वकील यांना टोकन दिले जाईल. कैद्याला भेटण्यापूर्वी टोकन दाखवावे लागेल. या सर्व प्रक्रियेनंतर कैद्याला भेटता येईल.
5 / 8
आपल्या मुलाला कसा भेटला शाहरुख खान? - तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला भेटण्यासाठी शाहरुख खानला विशेष ट्रिटमेंट दिली गेली नाही. भेटीच्या वेळी आर्यन खान आणि शाहरुख यांच्यामध्ये एक ग्रिल आणि काचेची भिंत होती. असे कोरोनामुळे करण्यात आले होते. शाहरुख आणि आर्यन हे इंटरकॉमवर बोलले. यावेळी 2 रक्षकही तेथेच उपस्थित होते.
6 / 8
आपल्या वडिलांना खूप दिवसांनंतर बघून आर्यन खानच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो अत्यंत भाऊक झाला होता. शाहरुख खानसाठीही आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहणे सोपे नव्हते. 15 मिनिटांच्या या वेळेत शाहरुखही अत्यंत भाऊक झालेला होता.
7 / 8
यावेळी, आपल्याला तुरुंगातील अन्न पसंत नाही, असे आर्यन खानने वडिलांना, म्हणजेच शाहरुख खानला सांगितले. शाहरुखही यावेळी अत्यंत चिंतीत दिसत होता. घरचे अन्न देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे तुरुंगाधिकाऱ्यांनी शाहरुखला सांगितले आहे.
8 / 8
आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने क्रूझ ड्रग्स पार्टीदरम्यान ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि तो एनसीबीच्या कोठडीत होता. एनसीबीची कोठडी संपल्यानंतर आर्यनला आर्थर रोड कारागृहात पाठविण्यात आले. 2 ऑक्टोबरला आर्यन खान पकडला गेला, तेव्हा किंग खानचे परदेशात शूटिंग सुरू होते.