Join us  

OTT वर कमाईचा नवा ट्रेंड : अनन्या व ईशानचा ‘खाली पीली’ पाहण्यासाठी दरवेळी मोजावे लागणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 2:50 PM

1 / 10
अभिनेत्री अनन्या पांडे आणि ईशान खट्टर स्टारर ‘खाली पीली’ येत्या 2 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण हा सिनेमा पाहतांना प्रत्येकवेळी पैसै मोजावे लागणार आहेत.
2 / 10
होय, ‘खाली पीली’ या सिनेमाच्या प्रदर्शनापासून ‘Pay per View’ हा नवा पायंडा पाडला जाणार आहे.
3 / 10
‘Pay per View’ म्हणजे काय तर, कोणताही सिनेमा प्रत्येकवेळी पाहताना पैसे द्यावे लागणार आहेत.
4 / 10
सिनेमागृहात चित्रपट पाहण्याच्या संकल्पनेवर ‘Pay per View’ ही नवीन संकल्पना आधारित आहे.
5 / 10
मकबूल खान दिग्दर्शित ‘खाली पीली’ हा सिनेमा झी प्लेक्स वर प्रदर्शित होणार आहे. झी 5वर देखील हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमापासून ‘Pay per View’ही नवीन परंपरा सुरू केली जाणार आहे.
6 / 10
कोरोना महामारीमुळे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित होणे थांबले आहे. यामुळे निर्मात्यांनी ओटीटीवर सिनेमे प्रदर्शित करण्याचा धडाका लावला आहे. पण यामुळे निर्मात्यांना तोटा सहन करावा लागतोय.
7 / 10
ओटीटीच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सब्सक्रायबर्स वन टाइम सब्सक्रिप्शन घेऊन प्रेक्षक कितीही वेळा सिनेमा पाहतात. म्हणजेच त्यांना एकदाच पैसे भरावे लागतात. हे नुकसान टाळण्यासाठी ‘पे पर व्ह्यू’ची आयडिया लढवण्यात आली आहे.
8 / 10
झी स्टुडिओजचे सीईओ शारिक पटेल यांनी याबद्दलचे संकेत दिले आहे. याबाबत अद्याप किंती शुल्क आकारायचे हे निश्चित नाही, लवकरच किंमत ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
9 / 10
‘खाली पीली’ या सिनेमात अनन्या पांडे आणि ईशान खट्टर लीड भूमिकेत आहेत.
10 / 10
ईशान याआधी धडक सिनेमात दिसला होता आणि त्यानंतर तो जगप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद मजीदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ सिनेमातही दिसला होता. अनन्या पांडे याआधी दोन सिनेमात दिसली होती. ‘स्टुडंट आॅफ द इअर2’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला होता़ यानंतर ‘ पती पत्नी और वो’ या सिनेमात ती झळकली होती.
टॅग्स :अनन्या पांडेइशान खट्टर