Join us  

Maldives vs Lakshdweep Row: बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बिपाशाने गाठलं मालदीव, नेटकरी म्हणाले, "परत इकडे येऊ नको"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 9:47 AM

1 / 10
बिपाशा बासू ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. नुकताच बिपाशाने तिचा ४५वा वाढदिवस साजरा केला.
2 / 10
वाढदिवस साजरा करण्यासाठी बिपाशाने पती करण सिंग ग्रोव्हर आणि लेक देवीसह थेट मालदीव गाठलं.
3 / 10
बर्थडे सेलिब्रेशनबरोबरच बिपाशाने मालदीव व्हॅकेशनचेही काही फोटो तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
4 / 10
पण, बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मालदीवमध्ये गेलेली बिपाशा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मालदीवमध्ये असलेल्या बिपाशाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
5 / 10
तिच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. तर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये बिपाशाला सुनावलं आहे.
6 / 10
एकाने कमेंट करत 'मालदीववरुन आता इकडे येऊ नको. असं पण तुझी इथे गरज नाही', असं म्हटलं आहे.
7 / 10
'मालदीव सरकारने आपला अपमान केला. आणि तू मालदीवमध्ये फिरत आहेस, तू तर देशद्रोही निघालीस,' अशी कमेंटही केली आहे.
8 / 10
'सुजाण नागरिक बन आणि देशात काय चालू आहे, ते जाणून घे', अशा आशयाच्या कमेंटही केल्या आहेत.
9 / 10
'मालदीव रिसॉर्टचे फोटो पोस्ट करू नकोस', अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे.
10 / 10
लक्षद्वीप आणि मालदीववरुन सुरू असलेल्या वादादरम्यानच बिपाशाने मालदीवमध्ये बर्थडे साजरा केला. त्यामुळे बिपाशाला ट्रोल केलं गेलं आहे.
टॅग्स :बिपाशा बासूलक्षद्वीपमालदीव