Join us  

ऐश्वर्या रायने वडिलांच्या पुण्यतिथीला शेअर केले हे फोटो, जागवल्या त्यांच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 7:27 PM

1 / 8
ऐश्वर्या रायने वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
2 / 8
तिने तिच्या वडिलांच्या फोटोसमोर तिची आई, भाऊ, अभिषेक आणि आराध्यासोबत फोटो काढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
3 / 8
ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय यांचे दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले होते.
4 / 8
कॅन्सरने त्रस्त असल्याने कृष्णराज यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण तरीही दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावतच गेली.
5 / 8
वडिलांच्या निधनानंतर ऐश्वर्या पूर्णपणे खचली होती. पण तिला तिचा पती अभिषेकने या दुःखातून बाहेर पडण्यास मदत केली.
6 / 8
ऐश्वर्या रायच्या कुटुंबियांच्या या दुःखात संपूर्ण बच्चन कुटुंब त्यांच्या पाठिशी उभे राहिले होते.
7 / 8
ऐश्वर्याच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.
8 / 8
ऐश्वर्या तिच्या वडिलांची प्रचंड लाडकी होती. तिने अनेक मुलाखतींमध्ये याविषयी सांगितले आहे.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन