Join us

​या क्रिकेटपटूसोबत डिनर डेटवर गेली निधी अग्रवाल, विश्वास बसत नसेल तर हा घ्या पुरावा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 10:27 IST

टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून डेब्यू करणारी हॉट अभिनेत्री निधी अग्रवाल अचानक चर्चेत आली आहे. होय, यामागचे कारण ...

टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून डेब्यू करणारी हॉट अभिनेत्री निधी अग्रवाल अचानक चर्चेत आली आहे. होय, यामागचे कारण आहे, तिची डिनर डेट. परवा रात्री निधी एका क्रिकेटपटूसोबत दिसून आली आणि चर्चेचे पेव फुटले. आता हा क्रिकेटपटू कोण, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल तर त्याचे नाव आहे, के एल राहुल. होय, तोच तो किंग्स इलेव्हन पंजाबचा स्टार खेळाडू के एल राहुल. खरे तर सहजी या बातमीवर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण निधी व राहुल या दोघांचे फोटो याचा पुरावा आहे.दोघांचे डिनर डेटदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. यात के एल राहुल व्हाईट टी शर्ट व जीन्समध्ये आहे तर निधी क्रॉप टॉप व रिप्ड जीन्समध्ये दिसतेय.के एल राहुल हा टीम इंडियाचा उत्तम फलंदाज आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये त्याने शानदार खेळ करत, सर्वांना अवाक् केले.बेंगळुरू येथे राहणारी निधी एक अभिनेत्री असण्याबरोबर प्रसिद्ध मॉडेलही आहे. शिवाय ह्यमिस दीवा-२०१४ह्ण या स्पधेर्ची ती स्पर्धक राहिली आहे. तिने बिजनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केले असून, सध्या ती पूर्णपणे अभिनय क्षेत्रात लक्ष देऊन आहे.२०१७ मध्ये निधीने ह्यमुन्ना मायकलह्ण या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. वास्तविक तिचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र प्रेक्षकांना तिचा अभिनय खूपच भावला होता. समीक्षकांनीही तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते. ALSO READ : बोल्ड फोटो शेअर करून टायगर श्रॉफच्या ‘या’ अभिनेत्रीने उडविली खळबळ!सध्या निधीकडे कुठल्याही बॉलिवूडपटाची आॅफर नाही. ती साउथच्या Savyasachi या चित्रपटात सध्या काम करीत आहे. तिचा हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, निधी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. तिच्या सोशल अकाउंटवर फॉलोअर्स वाढत असून, तिने लवकरच आणखी एका बॉलिवूडपटात झळकावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा असेल यात शंका नाही.