Join us  

कतरिना कैफच्या लग्नानंतर फॅन्स सलमानला देत आहे या तरूणीचा पत्ता, फोटो बघून व्हाल कन्फ्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 11:43 AM

1 / 7
कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ९ डिसेंबरला ती अभिनेता विक्की कौशलसोबत लग्न करणार आहे. अशात सलमान खानवरून (Salman Khan) अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. अनेक लोक तर आता सलमान खानला कतरिनासारखी दिसणाऱ्या मॉडलचा पत्ता देत आहेत. ती मॉडल यामुळे अचानक चर्चेत आली. चला जाणून घेऊ कोण आहे ही मॉडल आणि लोक का तिचा पत्ता सलमानला देत आहेत.
2 / 7
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) च्या अनेक डुप्लीकेट तुम्ही पाहिल्या असतील. पण आज आम्ही जिची ओळख करून देणार आहोत तिला बघून ओरिजनल आणि डुप्लीकेट यात फरक करता येणार नाही.
3 / 7
अलीना राय (Alina Rai) असं या मॉडलचं नाव असून सोशल मीडियावर ती अॅक्टिव आहे. ती तिच्या व्हिडीओजमुळे चांगलीच प्रसिद्ध आहे. ती हुबेहुब अभिनेत्री कतरिना कैफसारखी दिसते. आता कतरिनाच्या लग्नानंतर फॅन्स सलमानला अलीनाचा पत्ता देत आहेत.
4 / 7
२०१९ मध्ये पॉप्युलर रॅपर आणि गायक बादशाहचा एक म्युझिक व्हिडीओ अल्बम रिलीज झाला होता. ज्याचं टायटल 'कमाल है' होतं. या व्हिडीओत बादशाहसोबत अलीना दिसली होती. हे गाणं चांगलंच गाजलं होतं.
5 / 7
अलीना राय सोशल मीडियावर चांगलीच फेमस आहे. तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर फॅन्स भरभरून कमेंट्स करत असतात. अलीना आणि कतरिनाचा चेहरा इतका मिळता जुळता आहे की फॅन्सचा विश्वास बसत नाही.
6 / 7
अलीना राय लवकरच सिनेमातही दिसणार आहे. तिने शूटींग सेटवरून काही फोटोही शेअर केले होते. अलीनाचा सिनेमा गेल्यावर्षी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे होऊ शकला नाही. २०२० मध्ये अलीनाने एक मुलाखत दिली होती. ज्यात ती म्हणाली होती की, ती तिच्या सिनेमात एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
7 / 7
टॅग्स :कतरिना कैफसलमान खान