Join us  

SEE PICS : अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?

By रूपाली मुधोळकर | Published: September 20, 2020 11:05 AM

1 / 12
अभिनेत्री पायल घोष हिने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
2 / 12
पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले आहे.
3 / 12
पायलच्या दाव्यानुसार 2014-15 दरम्यान तिची व अनुरागची ओळख झाली होती. अनुरागने दारूच्या नशेत तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.
4 / 12
पायल पेशाने एक अभिनेत्री आहे़ तिच्या विकीपीडिया पेजनुसार, 13 नोव्हेंबर 1989 रोजी कोलकात्यात तिचा जन्म झाला.
5 / 12
तिने कोलकात्याच्या स्कॉटिशा चर्च कॉलेजातून पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली.
6 / 12
पायलच्या विकीपीडिया पेजनुसार, पायलने अभिनयक्षेत्रात काम करण्यास तिच्या कुटुंबाचा प्रखर विरोध होता. त्यामुळे कॉलेजच्या सुट्टीत पायल कोलकात्यावरून मुंबईला पळून आली होती.
7 / 12
मुंबईत आल्यानंतर तिने एका अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. वयाच्या केवळ 17 व्या वर्षी तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली.
8 / 12
2008 साली Sharpe's Peril या इंग्रजी टेलिफिल्ममध्ये तिने काम केले. यात तिने पश्चिम बंगालच्या एका गावात राहणा-या स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीची भूमिका साकारली होती.
9 / 12
एका कॅनडियन चित्रपटातही तिने काम केले. 2009 मध्ये तिने पायनाम या तेलगू सिनेमात काम केले. काही तेलगू व कन्नड सिनेमात यानंतर ती दिसली.
10 / 12
2017 मध्ये पायलने पटेल की पंजाबी शादी या हिंदी सिनेमात काम केले. या सिनेमाद्वारे तिचा बॉलिवूड डेब्यू झाला.
11 / 12
एप्रिल 2020 मध्ये तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करत, काम नसल्याचे म्हटले होते. काम नसल्याने आर्थिक तंगीत असल्याचेही तिने पोस्टमध्ये म्हटले होते.
12 / 12
काही दिवसांपूर्वी पायलने सुशांत सिंग राजपूत आपला 4 वर्षे जिम पार्टनर होता, असाही दावा केला होता.
टॅग्स :अनुराग कश्यप