Join us  

तुला हे शोभत नाही...! ‘टॅटू’ प्रेमामुळे ट्रोल झाली आमिरची लेक इरा खान

By रूपाली मुधोळकर | Published: October 11, 2020 12:39 PM

1 / 9
अभिनेता आमिर खान याची लेक इरा खान सोशल मीडियावर हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या इरा तिच्या टॅटू प्रेमामुळे चर्चेत आहे. पण हे काय, या टॅटू प्रेमामुळे इराला ट्रोलही व्हावे लागतेय.
2 / 9
अभिनेत्री होण्यापेक्षा इराने दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे झाले करिअरचे. याशिवाय तिच्या अनेक आवडीनिवडी आहेत. सध्या ती तिची बकेट लिस्ट पूर्ण करत आहे आणि त्यातली पाचवी गोष्ट तिने पूर्ण केली आहे.
3 / 9
ही पाचवी गोष्ट म्हणजे, टॅटू आर्टिस्ट व्हायचे स्वप्न तिने पूर्ण केले आहे. टॅटू काढण्याचे ट्रेनिंग घेत तिने पहिला टॅटू काढला. या टॅटूचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
4 / 9
पण तूर्तास इरा याच टॅटूप्रेमामुळे ट्रोल होत आहे. नेटक-यांनी तिला ट्रोल केले. तिच्यावर टीका करताना अनेक युजर्सनी तिला रुढीवादी धार्मिक शिस्तीची आठवण करून देण्यात आली.
5 / 9
तू मुस्लिम आहेस आणि तुला हे शोभत नाही, असे एका युजरने तिला सुनावले.
6 / 9
तू एक ‘पवित्र मुस्लीम’ अजिबात नाही, अशा शब्दात देखील लोकांनी तिच्यावर टीका केली. ही कला इस्लाममध्ये पाप असल्याचेही काहींनी महटले.
7 / 9
बिनधास्त इराने या अशा ट्रोलर्सना उत्तर देणे नेहमीप्रमाणेच टाळले. या ट्रोलिंगकडे तिने नेहमीसारखे दुर्लक्ष केले.
8 / 9
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमेऱ्यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते.
9 / 9
सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती.
टॅग्स :इरा खानआमिर खान