Join us  

60 च्या दशकात सेक्स सिम्बॉल म्हणून ओळखली जायची ही अभिनेत्री, करावा लागला होता छेडछाडीचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 6:00 AM

1 / 15
बॉलीवुडच्या पहिल्या आयटम गर्लचा मान हा अभिनेत्री हेलन यांनाच जातो.
2 / 15
हिंदी सिनेमांमध्ये आयटम नंबर सुरु करण्याचं श्रेय हे हेलन यांनाच जातं.
3 / 15
दिलखेचक अदा, घायाळ करणारं नृत्य यानं हेलन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
4 / 15
कॅब्रे डान्स भारतात लोकप्रिय करण्याचं श्रेयसुद्धा हेलन यांनाच जातं.
5 / 15
मात्र हेलन यांना करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल सहन करावा लागला.
6 / 15
60च्या दशकात हेलन यांच्याकडे सेक्स सिम्बॉल म्हणून पाहिलं जाऊ लागलं.
7 / 15
हेलन यांनी आपल्या डान्ससह सौंदर्यानं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. मात्र त्यांचं हेच सौंदर्य त्यांना त्रासदायक ठरु लागलं.
8 / 15
सुंदर असल्याचा त्रासही त्यांना सहन करावा लागला. कधी कधी तर त्यांना छेडछाडीचा त्रासही सहन करावा लागला.
9 / 15
त्र घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना काम थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे या छेडछाडीचा सामना करण्यासाठी त्यांनी एक शक्कल शोधून काढली.
10 / 15
शुटिंगला जाताना हेलनजी बुरखा घालून घरातून बाहेर पडू लागल्या. त्यामुळे हेलनजींना ओळखणं शक्य नव्हतं.
11 / 15
अशाप्रकारे त्यांनी छेडछाडीपासून स्वतःचा बचाव केला. प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या हेलन या ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या दुस-या पत्नी आहे.
12 / 15
दबंग खान सलमानच्या हेलन या सावत्र आई आहेत. मात्र आई म्हणून सलमान त्यांचा आपल्या आई इतकाच आदर करतो.
13 / 15
वयाच्या 19 वर्षी त्यांना 'हावडा ब्रिज' या सिनेमात पहिली संधी मिळाली.
14 / 15
सिनेमाला यशस्वी करण्यासाठी त्यात गाण्यांसोबत एक तरी आयटम डान्स असावा असा निर्माता आणि दिग्दर्शकांचा आग्रह असतो.
15 / 15
याच आयटम डान्समुळे सिनेमाची वेगळी प्रसिद्धी होते.
टॅग्स :हेलनसलीम खान