6051_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 12:11 IST
भारत हा आकाराने सातवा सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जगातील दुसरा देश आहे. गुढ अर्थाने भारताकडे जगाचे लक्ष असते. १०० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियाई भागात हिमालयापासून ते भारतीय समुद्रापर्यंत हा देश वैविध्याने नटला आहे. विविध धर्मांची आणि वंशाची शेकडो वर्षाची परंपरा देशाला लाभली आहे. या ठिकाणी हिंदू, जैन, सीख आणि बुद्ध धर्म सामावला आहे. खाद्यपदार्थ हे गॅजेटपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत आणि क्रिकेटपटू, अभिनेते जणू आपले नातेवाईकच असल्यासारखे लोक वागतात. भारताच्या अशाच वैविध्यपूर्ण जीवनाचा हा घेतलेला आढावा.
6051_article
भारत हा आकाराने सातवा सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जगातील दुसरा देश आहे. गुढ अर्थाने भारताकडे जगाचे लक्ष असते. १०० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियाई भागात हिमालयापासून ते भारतीय समुद्रापर्यंत हा देश वैविध्याने नटला आहे. विविध धर्मांची आणि वंशाची शेकडो वर्षाची परंपरा देशाला लाभली आहे. या ठिकाणी हिंदू, जैन, सीख आणि बुद्ध धर्म सामावला आहे. खाद्यपदार्थ हे गॅजेटपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत आणि क्रिकेटपटू, अभिनेते जणू आपले नातेवाईकच असल्यासारखे लोक वागतात. भारताच्या अशाच वैविध्यपूर्ण जीवनाचा हा घेतलेला आढावा.भारतामधील खाद्यपदार्थ हे पौष्टिकता आणि चवीच्या बाबतीत जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामधील असणारे पदार्थ आणि चव ही स्थानपरत्वे बदलत असते. त्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि वातावरणानुसार भोजन तयार केले जाते. चिकन करी, टिक्का, बिर्यानी आणि पनीरपर्यंत सारे काही मिळते. भारताचे खाद्यपदार्थ ऐतिहासिक आहेत. काही डिशेश अगदी पाच मिनिटात तयार होतात तर अनेक मुघलाई पदार्थ शिजण्यासाठी ८ ते १० तास लागतात. मुघलाई, दक्षिण भारतीय, पारशी, बोहरा, गुजराती, उत्तरपूर्व, पंजाबी आणि काश्मिरी भोजन यापैकी एक आहेत. पोहे, कचोरी, जिलेबी हे नाष्ट्यासाठी तर भाजी, बिर्याणी हे दुपारच्या भोजनासाठी, स्रॅक्स, नान, ब्रेड, तंदुरी रात्रीच्या जेवणासाठी असतात. जेवणानंतर गुलाब जामुन, रस मलाई, पान हे तुम्हाला मिळतील. हिंदु धर्मात ३३ कोटी देव असल्याची श्रद्धा आहे. त्याशिवाय इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि सीख धर्मही आहेत. प्रत्येक धर्माच्या श्रद्धेनुसार सण, उत्सव साजरे केले जातात. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सण साजरे होतात. काही तर आठवडाभर चालतात. त्यात खाद्यपदार्थ, भेटवस्तू, संगीत आणि नृत्याचा समावेश असतो. प्रत्येक सणामागे परंपरा आणि गोष्टी आहेत. दृष्टांवर चांगल्याचा विजय, देवाचा जन्म, बहीणभावाचे बंधन, पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ तर काही लग्नाच्या बंधनासाठी साजरे केले जातात. कुटुंबे एकत्र येणे, पाहुणे, मित्र एकत्र येत केलेले भोजन, उपवास यांचा यात समावेश आहे. भारतासारखा परिसर, निसर्गरम्यता क्वचितच जगातील इतर देशांना लाभली असेल. हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशापासून भारतीय समुद्र, अरबी समुद्र, बंगालच्या खाडीपर्यंत सारे आढळून येईल. उत्तर भागात अत्यंत सुंदर हिरवळ, पश्चिम भागात राजस्थानचे वाळवंट, समुद्रकिनारी असणारी भारतामधील मुख्य व्यावसायिक शहरे, उत्तरपूर्व भागात असणारे डोंगराळ प्रदेश, चहाचे मळे, हिमालयाच्या पर्वतरांग़ामधून वाहणाºया नद्या, त्याशिवाय या ठिकाणी चालणारे ट्रेकिंग, वॉटर स्पोर्टस् जबरदस्त आहेत. राजस्थान, कर्नाटक, महाराष्टÑ आणि मध्य प्रदेश या राज्यात किल्ले, राजवाडे पाहण्यासारखे आहेत. ताज महल, सुवर्णमंदिर, सूर्यमंदिर, जामा मस्जीद, कुतुब मिनार, चारमिनार, गेट वे आॅफ इंडिया, इंडिया गेट, लोटस टेम्पल, लाल किल्ला ही स्मृतीस्थळे वास्तूशास्त्राचा बेजोड नमुना आहेत. भारत हा जगामधील असा एक देश आहे, ज्या ठिकाणी वर्षभर वेगवेगळे ऋतु पाहण्यास मिळतात. जानेवारी ते मार्च हिवाळा, मार्च ते मे वसंत, मे ते जुलै उन्हाळा, जुलै ते सप्टेंबर पावसाळा, सप्टेंबर ते ते नोव्हेंबर शरद आणि नोव्हेंबर ते जानेवारी हिवाळापूर्व असे ऋतु असतात. उत्तर भागात कडक उन, समुद्रकिनारी गरम आणि दमट तर हिमालयीन पर्वतरांगामध्ये थंड हवामान असते. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासारखे असतात. भारतामध्ये आर्थिक स्तरामध्ये खूपच फरक आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या धर्मातील लोक, विविध शाळांमधून आलेले असतात, त्यामुळे जीवनशैलीतही बराचसा फरक आढळतो. इतके असले तरी समाजात तुम्हाला वेगळेपण दिसणा नाही. ठराविक साच्यातील आणि एकसुरी जीवनशैली तुम्हास पहावयास मिळणार नाही. दुकानात गेल्यानंतर तुम्हाला परवडण्यासारखे आहे. भारतामधील लोक अत्यंत कमी पैशात आपले जीवनमान चालवितात. इंग्लंडच्या तुलनेत ७० टक्के तर अमेरिकेच्या तुलनेत ६० टक्के इतका कमी खर्च भारतामध्ये जगण्यासाठी येतो. केवळ २० रुपयात तुम्हाला जेवण मिळते. मालमत्तेच्या किमती, खाद्यपदार्थ, पालेभाज्या या भारतामध्ये कमी पैशात उपलब्ध आहेत. वाहतुकीचे आणि राहण्याचे योग्य मार्ग निवडल्यास तुमचा प्रवासाचा खर्चही खूप कमी येतो.