5415_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 15:34 IST
आपल्या अंगी आत्मविश्वास असणे ही गोष्ट सर्वच बाबतीत अग्रेसर ठरते. ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असते, ते अयशस्वी ठरतात आणि त्यांच्या पदरी निराशा येते. काही जन्मत:च प्रचंड आत्मविश्वासी असतात आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांच्यापेक्षा नेहमीच सरस ठरतात. मी कोण आहे आणि मी कोण होऊ शकतो, हे मला जाणता आले पाहिजे. ज्यांना आत्मविश्वास वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी मार्ग सांगत आहोत.
5415_article
आपल्या अंगी आत्मविश्वास असणे ही गोष्ट सर्वच बाबतीत अग्रेसर ठरते. ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असते, ते अयशस्वी ठरतात आणि त्यांच्या पदरी निराशा येते. काही जन्मत:च प्रचंड आत्मविश्वासी असतात आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांच्यापेक्षा नेहमीच सरस ठरतात. मी कोण आहे आणि मी कोण होऊ शकतो, हे मला जाणता आले पाहिजे. ज्यांना आत्मविश्वास वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी मार्ग सांगत आहोत.एखार्ट टोले यांच्या अनुसार ‘तुम्ही या ठिकाणी जगाचे आतापर्यंत माहिती नसलेले कोडे उलगडण्यासाठी दैवी क्षमतेने आला आहेत. त्यामुळे तुम्ही अत्यंत महत्वाचे आहात’ ही शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जी तुमचा आत्मविश्वास वाढविते. तुम्ही खास आहात आणि लोक काय म्हणतात हे महत्वाचे नसून, तुम्ही एका कारणासाठी या जगात आला आहात आणि जोपर्यंत तुमचा तुमच्यावर विश्वास नाही, तोपर्यंत कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. जग तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल परंतु तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सतत वर नेईल.आव्हानांचा सामना करा तुमच्यापैकी बरेच जण सहमत असाल की, तुम्ही नवी आव्हाने स्वीकारता आणि ती पूर्ण करुन दाखविता. तुम्हाला तुमच्यातील आनंद मिळतो आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही लक्ष्यापर्यंत जाणार नसाल तर तुमची क्षमता कळणार नाही. अशा वेळी १०० टक्के नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही इच्छित स्थळापर्यंत जाण्याचे धाडस केले पाहिजे आणि ते साध्य केले पाहिजे. सुरुवातीला अपयश येईल, पण जसजसे तुम्ही पुढे जाल, तसतसे रस्त्यावरील खड्डे लागतील आणि तुम्ही पाठीमागच्या खुर्चीवर बसणार नाही आणि हा प्रवास न करावा असे तुम्हाला वाटेल. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात चांगला असतो. तुम्ही तुमच्यातील चांगल्या गोष्टी शोधून काढा. स्वत:लाच अशा चांगल्या गोष्टी करण्याची परवानगी द्या. आपण नेहमीच आपल्याला कमी लेखतो. तुम्ही केलेली प्रत्येक लहानात लहान गोष्ट तुमची क्षमता सिद्ध करीत असते आणि ती गोष्ट कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही. आपली ताकद ओळखा आणि त्यावर अधिक लक्ष द्या. एखादे काम बरेच दिवस झाले तरी करत नसतो आणि ते करण्यासाठी तयारीही नसते. अशांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो. बºयाच दिवसापूर्वीची हरविलेली ओळख, काही साहसी सहलींना जाण्याची इच्छा, आपल्या आवडीच्या छंदवर्गात प्रवेश इत्यादी. तुम्ही कोणताही निर्णय घ्या आणि तो पूर्ण करा. कदाचित तो अवघडही असू शकतो, मात्र तुमचा आत्मविश्वास त्यामुळे वाढतो. तुमच्याकडे गमावण्यासारखे काही नसते मात्र रस्त्याच्या शेवटच्या टोकावर वाट पाहत थांबलेली अपेक्षा पूर्ण होते. हे अत्यंत सकारात्मक तंत्र आहे आणि ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला उपयोगी पडू शकते. आपल्या मनात काय चालले आहे याबाबत तुमचा मेंदू वस्तुस्थिती आणि स्पष्ट प्रतिमा यांच्यात भेदभाव करु शकत नाही. कधी कधी तुम्हाला स्वप्न पडते की तुम्ही खाली पडत आहात आणि जागे होऊन तुम्ही गुडघ्यावर उभे राहता. कारण आपला मेंदू आपल्याला सूचना देत असतो. कल्पनाशक्ती अशीच प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टीला घाबरता त्या गोष्टी हुबेहुब दाखविते. मग तुम्ही अशा स्थितीला तोंड देण्यासाठी आत्मविश्वास बाळगा आणि त्यातून बाहेर या. दुसºयांदा अशी स्थिती आल्यानंतर तुम्ही स्वत:ला सांगू शकता ही यापूर्वी हे झालेले आहे आणि आता घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.