5064_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 16:25 IST
जगात दोन प्रकारची माणसे असतात. जे जगभरातील लोकांची काळजी करीत असतात आणि जे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. आपण या ठिकाणी दुसºया पद्धतीच्या लोकांची माहिती घेणार आहोत, जे जग काय म्हणतील याचा काडीमात्र विचार करीत नाहीत. यामधील काही जणांवर सातत्याने विनोदही चालू असतात. तथापि, त्यांची ओळख करुन देत आहोत.
5064_article
जगात दोन प्रकारची माणसे असतात. जे जगभरातील लोकांची काळजी करीत असतात आणि जे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. आपण या ठिकाणी दुसºया पद्धतीच्या लोकांची माहिती घेणार आहोत, जे जग काय म्हणतील याचा काडीमात्र विचार करीत नाहीत. यामधील काही जणांवर सातत्याने विनोदही चालू असतात. तथापि, त्यांची ओळख करुन देत आहोत.या जगात आपल्याला लोक काय म्हणत आहेत याच्याशी काहीही देणेघेणे नसलेला माणूस म्हणजे ताहेर शाह. त्याचे नवीन गाणे ‘अँजेल’ सध्या भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेत टॉपवर आहे. जग त्याच्यावर अनेक ‘जोक’ करीत आहे, ट्विट करीत आहेत. या सर्वांचे ताहेरने आभार मानले आहेत. बºयाचशा लोकांच्या मते ताहेरचे गाणे ऐकणे म्हणजे भयानक अनुभव आहे. मात्र यामुळे ताहेरला काही फरक पडत नाही. जगात लोकांच्या संबंधाविषयीच्या कल्पना आहेत. मात्र सपनाने कोणत्याही पुरुषाशी लग्न करायचे ठरविलेले नाही. तिने स्वत:शी, मांजराशी लग्न करायचे ठरविले आहे. तिने जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. नेहमीच्या पद्धतीने विचार करणाºयांना सपनाचे हे वागणे आवडणार नाही, मात्र लग्नाची नवी व्याख्या तिने तयार केली आहे. राखी सावंतसारखी सरळमार्गी सेलिब्रिटी कोणी नाही. करण जोहरसोबतच्या कार्यक्रमात हे सर्वांच्या लक्षात आले. आपल्या मताशी ती नेहमी ठाम असते. प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणापासून सलमान खानच्या हीट अँड रन प्रकरणापर्यंत तिला काय वाटते हे कोणतीही काळजी न करता तिने सांगितले. तिने स्वत: एक नवा पक्ष स्थापन करुन २०१४ ची निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. जरी ती पराभूत झाली असली तरी राखी नेहमीच आश्वस्त राहिली आहे. ज्युनिअर चोप्राचे मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत. ट्विटरवरही तो लोकप्रिय असतो. धूम सिरीजमधील त्याच्या कामाबद्दल बºयाच जणांनी त्याची चेष्टाही केली होती. याकडे दुर्लक्ष करुन तो आपल्या मार्गाने चालला आहे. तो आला आणि त्याने जिंकले असेच काही हिमेशच्या बाबतीत झाले आहे. सगळे जग त्याच्या अनुनासिक आवाजाबद्दल हसत असले तरी संगीतकारापासून गायक, निर्माता, गीतकार आणि अभिनेता म्हणून त्याचे काम सुरूच आहे. त्याने अनेक चित्रपट केले आहेत. अर्थात त्याचे बरेचसे चित्रपट आपटलेही आहेत.