5007_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 15:19 IST
गेल्या काही वर्षांपासून कसोटी सामन्यांचे महत्व कमी होऊन टी-२० सामन्यांचे महत्व वाढीस लागले आहे. क्रिकेटप्रेमींना झटपट निकाल हवे आहेत. म्हणजे शास्त्रीय संगीतापेक्षा पॉप आणि जॅझची मागणी वाढल्यासारखे आहे. क्रिकेटमधील या प्रकाराची मागणी खूप वाढली आहे. प्रचंड गर्दीने भरलेली स्टेडियम्स, मौज, मस्ती यामुळे या प्रकाराकडे ओढा आहे. जगातील अशाच क्रिकेट स्पर्धांची माहिती देत आहोत.
5007_article
गेल्या काही वर्षांपासून कसोटी सामन्यांचे महत्व कमी होऊन टी-२० सामन्यांचे महत्व वाढीस लागले आहे. क्रिकेटप्रेमींना झटपट निकाल हवे आहेत. म्हणजे शास्त्रीय संगीतापेक्षा पॉप आणि जॅझची मागणी वाढल्यासारखे आहे. क्रिकेटमधील या प्रकाराची मागणी खूप वाढली आहे. प्रचंड गर्दीने भरलेली स्टेडियम्स, मौज, मस्ती यामुळे या प्रकाराकडे ओढा आहे. जगातील अशाच क्रिकेट स्पर्धांची माहिती देत आहोत.वाईट असो वा चांगली या खेळाने क्रिकेटची सारी व्याख्याच बदलून टाकली आहे. गेल्या २०० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात क्रिकेटचे इतके व्यावसायिकरण पहिल्यांदाच झाले आहे. इंडियन प्रिमीअर लीग अर्थात आयपीएलमुळे क्रिकेट हा व्यवसाय बनला. अनेक वादविवाद आणि मॅच फिक्सींगचे आरोपही मोठ्या प्रमाणावर झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्थानिक मंडळाच्या सहाय्याने या स्पर्धा भरविण्याचा निर्णय घेतला. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. आयपीएलपासून प्रेरणा घेऊन आॅस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने टी-२० ची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न केला. बिग बॅश ही सुरुवात आहे. हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे. बिग बॅश ही स्पर्धा आयपीएलपेक्षा थोडी स्वच्छ आणि कमी सांस्कृतिक स्पर्धा आहे. एलईडी स्टम्प्स आणि बेल्सचा वापर यातही करण्यात आला आहे. पंचांसाठी कॅमची सोय करण्यात आली आहे. यामध्ये ८ संघ सहभागी असतात. ही स्पर्धा २०११ पासून सुरु झाली. क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. पहिली कसोटी, पहिला एकदिवसीय सामना आणि पहिला टी-२० सामना इंग्लंडमध्ये खेळण्यात आला. ही पहिली व्यावसायिक टी-२० प्रकारची स्पर्धा आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. लोकांना आकर्षित करण्यात आणि गर्दी खेचण्यात टी-२० यशस्वी झाला आहे. मात्र आयपीएल आणि बिग बॅश इतकी लोकप्रियता याला लाभली नाही. दक्षिण आफ्रिका राम स्लॅम टी-२० स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत गाजते आहे. मोठ्या प्रमाणातील गर्दी आणि व्यावसायिक क्रिकेटमुळे जगभरातील सर्वोत्तम टी-२० स्पर्धेत या सामन्यांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षात या स्पर्धेची चमक कमी झाली आहे. मात्र इतर स्पर्धांच्या तुलनेत ही स्पर्धा अजूनही तग धरुन आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ही स्पर्धा आहे. पाकिस्तानी लोकांचे क्रिकेटबद्दल असलेले प्रेम पाहून मंडळाला ही स्पर्धा सुरू करावी लागली. ८ फेब्रुवारी २०१६ ला ही स्पर्धा सुरु झाली. अत्यंत कमी धावा या स्पर्धेदरम्यान झाल्या असल्या तरी लोकांमध्ये याबद्दल उत्साह आहे. क्रिकेट खेळाडूंसाठी खूप चांगले मानधन देण्यात आले आहे. मॅन आॅफ द मॅच साठी ४५०० डॉलर्स देण्यात येतात. आयपीएलमध्ये देण्यात येणाºया रकमेपेक्षा ही रक्कम चौपट आहे. आयपीएलच्या धर्तीवर बांगलादेश प्रिमीअर लीगची सुरुवात झाली. देशातील क्रिकेटमध्ये असणारी संधी पाहून याला सुरुवात करण्यात आली. मुस्तफीज उर रहमान यासारखे खेळाडू यातून निर्माण झाले. या स्पर्धेमुळे बांगला देशच्या खेळाडूंमध्ये इच्छाशक्ती निर्माण झाली आहे. या स्पर्धेत सात संघ खेळतात.