Join us

विदेशात या आलिशान ठिकाणी थांबतात बॉलिवूड स्टार्स; एका रात्रीचे भाडे जाणून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST

तुम्हाला माहिती आहे काय की, तुमचे फेव्हरेट स्टार्स जेव्हा हॉलिडे एन्जॉय करायला विदेशात जातात तेव्हा नेमके कुठे मुक्कामी थांबत असतात?, शिवाय त्या ठिकाणांसाठी त्यांना किती पैसे मोजावे लागतात? आज याचाच खुलासा आम्ही करणार आहोत. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान नेहमीच त्याच्या फॅमिलीसोबत लॉस एंजेलिसला हॉलिडे एन्जॉय करायला जात असतो. याठिकाणी तो ब्रेवरी हिल्स मॅन्शन येथे थांबतो. या मॅन्शनमध्ये एका दिवसाचा मुक्काम करण्यासाठी जवळपास १.९७ लाख रुपये मोजावे लागतात. या मॅन्शनमध्ये सहा लग्झरी बेडरूम, जकूजी, पूल आणि प्रायव्हेट टेनिस कोर्ट आहे.

तुम्हाला माहिती आहे काय की, तुमचे फेव्हरेट स्टार्स जेव्हा हॉलिडे एन्जॉय करायला विदेशात जातात तेव्हा नेमके कुठे मुक्कामी थांबत असतात?, शिवाय त्या ठिकाणांसाठी त्यांना किती पैसे मोजावे लागतात? आज याचाच खुलासा आम्ही करणार आहोत. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान नेहमीच त्याच्या फॅमिलीसोबत लॉस एंजेलिसला हॉलिडे एन्जॉय करायला जात असतो. याठिकाणी तो ब्रेवरी हिल्स मॅन्शन येथे थांबतो. या मॅन्शनमध्ये एका दिवसाचा मुक्काम करण्यासाठी जवळपास १.९७ लाख रुपये मोजावे लागतात. या मॅन्शनमध्ये सहा लग्झरी बेडरूम, जकूजी, पूल आणि प्रायव्हेट टेनिस कोर्ट आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी दुबई येथे हॉलिडे एन्जॉय करायला जाणे पसंत करते. याठिकाणी ती पाम जुमेरह प्रायव्हेट बीच विलामध्ये थांबणे पसंत करते. याठिकाणाहून बुर्ज खलिफा अरेबियन समुद्राचा नजारा बघता येतो. याव्यतिरिक्त याठिकाणी पू, बारबेक्यू, बीच, लॅण्डस्केप गार्डन आहे. शिल्पा याठिकाणी एक दिवसासाठी तब्बल ६६ हजार रुपये मोजते.सोनम कपूर न्यूयॉर्कच्या एनवायसी ड्रीम होममध्ये थांबणे पसंत करते. याठिकाणी पाच बेडरूम, जिम, पूल टेबल, गार्डन आदी सुविधा आहे. एका दिवसासाठी तब्बल १.०९ लाख इतके भाडे मोजावे लागते.मंदिरा बेदी श्रीलंका येथे व्हेकेशन एन्जॉय करणे पसंत करते. याठिकाणी ती मॅन्ग्रोव हॉटेलमध्ये थांबत असते. मॅन्ग्रोव कोलंबोमध्ये आहे. याठिकाणीदेखील लक्झरी सुयट्स, गार्डन, बेडरूम पूल आदी सुविधा आहेत. याठिकाणचे एका दिवसाचे भाडे जवळपास २६ हजार रुपये इतके आहे.मिलिंद सोमण नार्वे येथे हॉलिडे एन्जॉय करणे पसंत करतो. तो येथील बारकूट अपार्टमेंटच्या २१व्या मजल्यावर नेहमीच मुक्कामी असतो. हे अपार्टमेंट पूर्णपणे फर्निश आहे. येथे रूफ टेरिस, जिम आदी सुविधा उपलब्ध आहेत. फ्लोरच्या बाल्कनीतून समुद्र बघावयास मिळतो. याठिकाणचे एका दिवसाचे भाडे दहा हजार रुपये आहे.