Join us  

'पंछी बनु उडती फिरु मस्त गगन में...' मुन्नीची नवी पोस्ट, सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:15 PM

1 / 7
अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली.
2 / 7
या चित्रपटात मुन्नी ही भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राने केलेल्या अभिनयाचं सर्वांनीच तोंडभरू कौतूक केलं.हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता.
3 / 7
उत्तम पटकथा आणि अप्रतिम अभिनयाने सिनेमा सुपरहिट ठरला होता.अशातच हर्षालीचे काही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता मुन्नीला ओळखणंही कठीण झालं आहे.
4 / 7
या चित्रपटामुळे हर्षालीच्या फॅन फोलोइंगमध्येही जबरदस्त वाढ झाली. अभिनेता सलमानसह करिना कपूर तसेच नवाजुद्दीन सिद्धीकी यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळाली.
5 / 7
हर्षाली सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते. ती उत्तम डान्सरही आहे. लवकरच हर्षली पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसेल अशी शक्यता आहे.
6 / 7
दरम्यान, इन्स्टाग्रामवर हर्षालीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने आकाशी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. केसात गुलाब, कानात झुमके घालत तिने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय.
7 / 7
हर्षालीच्या या फोटोंवर जवळपास २ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :हर्षाली मल्होत्राबॉलिवूडसेलिब्रिटी