Join us  

PHOTOS: हाय गर्मी! जॅकलिनने बोल्डनेसच्या ओलांडल्या मर्यादा; हॉट पोज देत केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 7:44 PM

1 / 11
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नाना कारणांनी चर्चेत असते. महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
2 / 11
आता अभिनेत्रीने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले असून बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले.
3 / 11
जॅकलिन मूळची श्रीलंकेतील आहे, पण तिने आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नावलौकिक मिळवला. सध्या श्रीलंकेत लीजेंड्स क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सर्व सामने पल्लेकेले येथे होत आहेत.
4 / 11
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी अभिनेता संजय दत्त, जॅकलिन आणि बादशाह यांना आमंत्रित करण्यात आले होते. बादशाहने आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली. तर जॅकलीनने जबरदस्त डान्स केला.
5 / 11
जॅकलिनने आपल्या मायदेशात जोरदार डान्स करून चाहत्यांचे मनोरंजन केले. जॅकलिन फर्नांडिस नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादांमुळे, तर कधी ती तिच्या व्यावसायिक कामामुळे प्रसिद्धीच्या झोतात येते.
6 / 11
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे लेटेस्ट फोटो चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक अगदी घायाळ करणारा आहे.
7 / 11
तीन वेगवेगळ्या ड्रेसमध्ये ती अगदी सुंदर दिसत असून तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. ग्लासी मेकअप आणि मोकळे केस तिच्या सौंदर्यांत आणखी भर टाकत आहेत.
8 / 11
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. जॅकलिनचा हा हॉट अंदाज चाहत्यांना भावणारा आहे.
9 / 11
अलीकडेच सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा जॅकलिनसाठी व्हॅलेंटाईन डे निमित्त एक खास लव्ह लेटर लिहिले होते. तो सातत्याने पत्र लिहून नवे खुलासे करत असतो.
10 / 11
हल्ली जॅकलीन फर्नांडिस तिच्या चित्रपटांपेक्षा महाठग सुकेश चंद्रशेखरमुळे जास्त चर्चेत असते. सध्या तुरुंगात असलेला सुकेश नेहमीच तुरुंगातून जॅकलिन फर्नांडिसला लव्ह लेटर पाठवतो.
11 / 11
टॅग्स :बॉलिवूडजॅकलिन फर्नांडिससेलिब्रिटी