Join us  

ही गुलाबी हवा...! बिकिनीत बॉलिवूड अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज; चाहत्यांना दिसला 'आदी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 7:19 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली असतानाच अनन्याने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
2 / 10
अनन्याचा हा बिकिनी लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. अनन्याने इंस्टाग्रामवर गुलाबी बिकिनीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 10
अनन्याने स्पेनच्या इबिझा बेटावरचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर तिचे हे फोटो पोस्ट केले.
4 / 10
गुलाबी बिकिनी परिधान करून अनन्या तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
5 / 10
या फोटोंमध्ये अनन्या क्रूझवर पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. तसेच अभिनेत्रीसोबत एक लहान मूल आणि मुलगीही दिसत आहे.
6 / 10
अनन्याचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे अनन्याच्या फोटोमध्ये मागे बाईकवर असलेल्या व्यक्तीचा दाखला देऊन चाहते तिची फिरकी घेत आहेत. 'त्या बाईकवर आदी आहे का? (आदित्य रॉय)', अशी विचारणा एका चाहत्याने केली.
7 / 10
अनन्याचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
8 / 10
अभिनेत्रीचा एक फोटो पाहून असे दिसते की, इबीझामध्ये सध्या खूपच थंडी आहे. अनन्याचे नाक थंडीमुळे लाल झाल्याचे देखील पाहायला मिळते.
9 / 10
अनन्या शेवटच्या वेळी विजय देवरकोंडासोबत लायगरमध्ये दिसली होती. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी कानाडोळा केला अन् वाईटरित्या फ्लॉप झाला.
10 / 10
आता अनन्या आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल २' मध्ये झळकणार आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूडसोशल व्हायरलसेलिब्रिटी