Join us

Birthday Special​ : मनोज वाजपेयीच्या वाट्याला आला प्रचंड संघर्ष! पहिल्या पत्नीने सोडली होती साथ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 12:26 IST

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याचा आज (२३ एप्रिल) वाढदिवस. बिहारच्या नकरटियागंज येथे २३ एप्रिल १९६९ रोजी मनोजचा जन्म झाला. ...

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याचा आज (२३ एप्रिल) वाढदिवस. बिहारच्या नकरटियागंज येथे २३ एप्रिल १९६९ रोजी मनोजचा जन्म झाला. एका शेतक-याच्या घरी जन्मलेल्या मनोजचे नाव सुपरस्टार मनोज कुमारच्या नावावरून ठेवण्यात आले, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. कदाचित येथूनच मनोजचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला असावा. अभिनयचं करायचा, हे मनोजने लहानपणीचं ठरवले होते. खरे तर त्यांच्या वडिलांना मनोजने डॉक्टर बनावे, अशी इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.एकदा मनोजचा एक मित्र दिल्लीला जाणार होता. त्याने मनोजलाही सोबत चालण्याचा आग्रह केला. मनोजच्या आत चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा इतकी जबर होती की, मागचा पुढचा कुठलाच विचार न करता तो विना तिकिट दिल्लीला निघाला.  मी दिल्लीत स्वत:च्या बळावर शिकेल, असे म्हणून मनोज घरून निघाला खरा. पण दिल्लीत तग धरणे इतके सोपे नव्हतेच. दिल्ली विद्यापीठात मनोजने कसाबसा प्रवेश मिळवला. या काळात विद्यापीठांख्या लहान-मोठ्या नाटकांत तो भाग घ्यायचा. काही पथनाट्येही करायचा. याकाळात नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचे नाव मनोजने ऐकले. येथूनच नसीरूद्दीन शहा आणि ओम पुरीसारख्या बड्या अभिनेत्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले होते. पण याठिकाणी प्रवेश मिळवणे मनोजसाठी सोपे नव्हते. त्याने येथे प्रवेश मिळवण्यासाठी चारदा प्रयत्न केला. पण चारही वेळा त्याला नकार पचवावा लागला.  चौथ्यांदा त्याने अर्ज केला तेव्हा त्याला विद्यार्थी म्हणून रिजेक्ट करण्यात आले. पण येथे शिकवण्याची आॅफर मात्र दिली गेली. याच काळात महान रंगकर्मी बॅरी जॉनची साथ मनोजला मिळाली. मनोजमधील प्रतिभा पाहून जॉन इतके प्रभावित झाली की, त्यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये मनोजला १२०० रूपये पगाराची असिस्टंट टीचरची नोकरी दिली.इंडस्ट्रीत जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत असतानाचं मनोज वाजपेयी दिल्लीतील एका मुलीच्या प्रेमात पडला. त्यांनी लग्नही केले. पण हे लग्न केवळ दोन महिनेही टिकू शकले नाही. मनोजची आर्थिक स्थिती बरी नव्हती. त्यात वाट्याला आलेला प्रचंड संघर्ष. यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली.  त्याकाळात एकाच दिवशी मनोजला तीन नकार पचवावे लागले होते.  प्रचंड संघर्षानंतर एका टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाली. पण पहिल्याच टेकमध्ये त्याला रिजेक्ट करण्यात आले. यानंतर एका चित्रपटात एक लहानशी भूमिका त्याला मिळाली. पण सेटवर पोहोचल्यावर ती भूमिका अन्य कुणाला दिली गेल्याचे त्याला कळले. त्याचदिवशी एका दिग्दर्शकाने काम देऊ केले असताना अचानक  नाही म्हटले. इतका टोकाचा संघर्ष वाट्याला येऊनही मनोजच्या मनात अभिनेता बनण्याची महत्त्वाकांक्षा कायम होती.कदाचित या महत्त्वाकांक्षेमुळे   ‘बँडेड क्वीन’मधील प्रमुख भूमिका स्वत:हून मनोजकडे चालून आली. मनोजचे फोटो तिग्मांशू धूलियाकडे कसे पोहोचले माहित नाही. पण हे फोटो पाहून तिग्मांशूने ‘बँडेड क्वीन’साठी मनोजची निवड केली होती. तिग्मांशू त्यावेळी कास्टिंग डायरेक्टर होता. त्याने शेखर कपूरला मनोजचे नाव सुचवले होते. यानंतर मात्र मनोजचे नशीब फळफळले. पुढे ‘सत्या’मधील भीकू मात्रेच्या भूमिकेने मनोजला वेगळीच ओळख दिली. या भूमिकेसाठी त्याला बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्टरचा अवार्ड मिळाला. यानंतर मनोजने कधीच मागे वळून पाहिले नाही.ALSO READ : ​मनोज वाजपेयीने सांगितले त्याच्या स्ट्रगलिंग दिवसांविषयी.. पाटण्यात राहायचा एका छोट्याशा घरात२००६ मध्ये मनोजने अभिनेत्री नेहासोबत लग्न केले. नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. नेहाने १९९८ मध्ये बॉबी देओलसोबत ‘करीब’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.