Join us  

Bigg Boss मध्ये मिळालेल्या मानधनाचं काय करणार? तृप्ती देसाई म्हणतात...

By शर्वरी जोशी | Published: November 08, 2021 4:34 PM

1 / 8
छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी. यंदा या शोचं तिसरं पर्व सुरु असून पहिल्या दिवसापासून ते चांगलंच गाजत आहे.
2 / 8
नुकतीच बिग बॉसच्या घरातून तृप्ती देसाई यांची एक्झिट झाली आहे. रविवारी रंगलेल्या बिग बॉसच्या चावडीवर त्यांचा प्रवास शेवटचा ठरला.
3 / 8
जवळपास ५० दिवस या घरात राहून तृप्ती देसाई यांनी हे पर्व गाजवलं. विशेष म्हणजे त्यांच्या स्वभावाची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहाता आली.
4 / 8
आंदोलनाच्या वेळी भांडण करणाऱ्या, आक्रमक होणाऱ्या तृप्ती देसाई खऱ्या आयुष्यात प्रचंड वेगळ्या असून बिग बॉसच्या घरात त्यांच्यात दडलेली आई, जबाबदार मोठी बहीण, मैत्रीण अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांनी जवळून पाहिल्या.
5 / 8
आंदोलनाच्या वेळी भांडण करणाऱ्या, आक्रमक होणाऱ्या तृप्ती देसाई खऱ्या आयुष्यात प्रचंड वेगळ्या असून बिग बॉसच्या घरात त्यांच्यात दडलेली आई, जबाबदार मोठी बहीण, मैत्रीण अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांनी जवळून पाहिल्या.
6 / 8
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांचा मोर्चा आगामी आंदोलनाकडे वळवला आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात मिळालेल्या मानधनाचं काय करणार हे त्यांनी लोकमत ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
7 / 8
तृप्ती देसाई यांचं बलात्कारमुक्त महाराष्ट्र हे नवीन आंदोलन लवकरच सुरु होणार आहे.
8 / 8
बलात्कारमुक्त महाराष्ट्र या नव्या आंदोलनासाठी, उपक्रमासाठी तृप्ती देसाई त्यांना मिळालेलं बिग बॉसचं मानधन वापरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.दरम्यान, बिग बॉसचं मानधन त्या समाजकार्यासाठी वापरणार असल्याचं समोर आलं आहे.
टॅग्स :तृप्ती देसाई