Join us  

बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना भाग्यश्री मोटेनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली - '...तर कोणालाही अधिकार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 1:20 PM

1 / 10
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी लाइफमुळे चर्चेत येत असते.
2 / 10
काही दिवसांपूर्वी भाग्यश्री मोटे हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत विजय पालांडेला डेट करत असल्याचे सांगितले होते.
3 / 10
आता ती बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. तिने या व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
दरम्याना तिच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये तिला बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल लगावले आहेत.
5 / 10
या पोस्टमध्ये भाग्यश्रीने लिहिले की, सोशल मीडियावर मी नकली राहू शकत नाही. माझा मीडिया आणि पोस्टकडे वास्तववादी दृष्टीकोण असतो आणि मी कायम असेच राहीन. मला एका वर्षापासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे माझे वजन वाढत आहे.
6 / 10
या पोस्टमध्ये भाग्यश्री पुढे म्हणाले की, इतरांवर टिप्पणी करताना संवेदनशील असले पाहिजे हे तुम्हा सर्वांना माहीत नसले तरीही. त्यामुळे कृपया तुम्ही माझ्या कामाचे कौतुक करू शकत नसाल तर माझ्या सध्याच्या टप्प्यावर भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. खूप प्रेम.
7 / 10
भाग्यश्री मोटे हिने व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
8 / 10
भाग्यश्री मोटेचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
9 / 10
भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. यापूर्वी ती काही मालिकांमध्ये झळकली होती.
10 / 10
भाग्यश्रीने 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ती तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही झळकली आहे.
टॅग्स :भाग्यश्री मोटे