Join us  

'बालक पालक' फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर अडकली लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:51 PM

1 / 10
बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर नुकतीच फोटोग्राफर राजेश करमारकरसोबत लग्नबेडीत अडकली आहे.
2 / 10
काही दिवसांपूर्वीच तिने होणाऱ्या नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते.
3 / 10
राजेश करमारकर हा प्रसिद्ध फोटोग्राफर असून त्याने खूप साऱ्या मराठी कलाकारांचे फोटोशूट केले आहे.
4 / 10
काही मोजक्या पाहुण्यांच्या आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला
5 / 10
बालक पालक हा शाश्वतीचा पाहिलाच चित्रपट. हा चित्रपट तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
6 / 10
दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बालक पालक या चित्रपटात शाश्वतीने डॉली ही महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती.
7 / 10
बालक पालक चित्रपटानंतर नंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
8 / 10
शाश्वतीचा जन्म पुण्यात झाला असून ती लहाणाची मोठी देखील पुण्यातच झाली.
9 / 10
बालपणापासूनच तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.
10 / 10
टॅग्स :रवी जाधव