Join us  

PHOTOS : अगदी माझ्यावर गेलाय...! आर्यन खानचं फोटोशूट अन् डॅडा शाहरूखची कमेंट...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 1:42 PM

1 / 8
‘किंगखान’ शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचं फोटोशूट. होय, आर्यनने पहिल्यांदा एका मोठ्या ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे.
2 / 8
आर्यनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आर्यनची आई गौरी खान हिने लेकाचा एक फोटो शेअर केला आणि पाठोपाठ शाहरूखने त्यावर अशी काही कमेंट केली की त्याचीच चर्चा रंगली.
3 / 8
गौरीने शेअर केलेल्या फोटोत आर्यनने ग्रे रंगाची टीशर्ट, त्यावर पिवळ्या रंगाचं जॅकेट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. या फोटोची खास बात म्हणजे, यात आर्यनने डॅडाची पोझ कॉपी केली आहे.
4 / 8
हा फोटो पाहून डॅडालाही कौतुक वाटलं. त्याने आर्यनचा हा फोटो रिटिष्ट्वट करत, त्यासोबत स्वत:चा ‘मैं हू ना’ चित्रपटातील फोटो शेअर केला. ‘माझ्यावर गेला आहे, माझा लाडका,’ अशी कमेंट शाहरूखने यावर केली.
5 / 8
इन्स्टाग्रामवरही शाहरूखने लेकाच्या फोटोवर कमेंट केली. तू खूप सुंदर दिसतोय आर्यन. तसंही म्हणतातच की, जे काही वडिलांमध्ये असतं ते मुलात दिसतं. पण मला सांग ही ग्रे टी-शर्ट माझी तर नाही? अशी कमेंट शाहरूखने केली आहे.
6 / 8
आर्यनने पहिल्यांदा एका जाहिरातीसाठी फोटोशूट केलं आहे. एका स्पोर्ट्स ब्रँडसाठी केलेल्या या फोटोशूटसाठी आर्यनने हटके पोझ दिल्या आहेत. प्रत्येक लूकमध्ये तो हँडसम दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्याच लूकची चर्चा रंगली आहे. अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत.
7 / 8
आर्यन खान सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह नाही. गेल्या 9 वर्षांत त्याने फक्त 25 पोस्ट केल्या आहेत. यात त्याचे भावाबहिणीसोबतचे काही फोटो आहेत. अर्थात याऊपरही आर्यनचे 21 लाख फॉलोअर्स आहेत.
8 / 8
आर्यन बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मात्र अद्याप तरी तशी घोषणा झालेली नाही. आर्यनची बहीण सुहाना लवकरच ‘द आर्चीज’ या सिनेमातून अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय. पण आर्यनचं आत्तापर्यंत तरी काहीही ठरलेलं नाही.
टॅग्स :आर्यन खानशाहरुख खानबॉलिवूड