Join us  

Anushka Shetty : कुठे गायब आहे 'बाहुबली'ची देवसेना?, बॅक टू बॅक सिनेमे ठरले फ्लॉप; टॉप अभिनेत्रींच्या यादीतही पडली मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 3:22 PM

1 / 10
दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते, ती नेहमीच चाहत्यांची आवडती आहे. तिला रुपेरी पडद्यावर पाहणे म्हणजे लोकांसाठी ट्रीटच आहे. पण एकेकाळी साऊथच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अनुष्का शेट्टी आज कुठे गायब आहे? २०२० मध्ये ती शेवटची सायलेन्स या चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून ती रुपेरी पडद्यावर दिसली नाही.
2 / 10
पण चाहत्यांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण त्याचा पुढचा चित्रपट मिस शेट्टी मिस्टर पॉली शेट्टीची घोषणा झाली आहे. हा सिनेमा याच वर्षी रिलीज होणार आहे. अनुष्काने या चित्रपटाचे लूक पोस्टर्स इन्स्टावर शेअर केले आहेत.
3 / 10
बाहुबली अभिनेत्रीसाठी हा सिनेमा हिट होणं खूप महत्त्वाचं आहे. सतत बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे देत अनुष्काची कारकीर्द घसरत चालली आहे. तिच्या मोठ्या हिटमध्ये बाहुबली २चा समावेश आहे. त्यानंतर त्याच्या एकाही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
4 / 10
बाहुबलीच्या जबरदस्त यशानंतर चाहते अनुष्काच्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत होते. पण त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. अनुष्का शेट्टीचा भागमती, निशब्धम/सायलेन्स फ्लॉप झाला.
5 / 10
बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे दिल्याने अनुष्का शेट्टीच्या करिअरवरही परिणाम झाला आहे. एकेकाळी ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जात होती. पण आता इतर हिरोइन्स तिच्या पुढे गेल्या आहेत.
6 / 10
समंथा, नयनतारा, रश्मिका मंदान्ना, प्रियामणी... हे सर्वजण त्यांच्या कारकिर्दीत अनुष्कापेक्षा चांगले काम करत आहेत.
7 / 10
अनुष्का शेट्टी तिच्या सह-नायिकांपेक्षा मागे पडताना दिसत आहे. आधी फ्लॉप चित्रपट देणे, नंतर सोशल मीडियावरील वावरही कमी झाला. या सर्व प्रकारामुळे अनुष्काच्या चाहत्यांमध्ये असलेली चर्चाही कमी झाली आहे.
8 / 10
बाहुबली २ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभाससोबतचे तिचे अफेअर आणि लग्न यामुळे ही अभिनेत्री बराच काळ चर्चेत होती. मात्र दोन्ही कलाकारांनी या वृत्तांचे खंडन केले.
9 / 10
बाहुबली फ्रँचायझीमध्ये अनुष्काने दुहेरी भूमिका साकारली होती. तिचं काम इतकं आवडलं की ती उत्तर भारताचीही आवडती बनली. ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र ती निव्वळ अफवा ठरली.
10 / 10
अनुष्काच्या हिट चित्रपटांमध्ये साईज झिरो, बिल्ला, सिंघम, बाहुबली १-२, डॉन, मिर्ची, रुद्रमादेवी, अरुंधती या चित्रपटांचा समावेश आहे.
टॅग्स :अनुष्का शेट्टीबाहुबली