Join us  

Aashram 3 : ...अन् अभिनेत्रीच्या वडिलांनी सांगितलं, "इंटिमेट सीन बिनधास्त कर बेटा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 8:00 AM

1 / 8
आश्रम या वेबसीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. लवकरच या सीरिजचा तिसरा पार्ट अर्थात ‘आश्रम 3’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. येत्या 3 जूनला ही सीरिज रिलीज होतेय. त्याआधी चर्चा आहे तर अनुरिता झा हिची.
2 / 8
होय, अनुरिता झा हिने आश्रम सीरिजमध्ये कविताची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये तिच्यावर काही बोल्ड दृश्य चित्रीत करण्यात आली होती. अलीकडे हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली.
3 / 8
तिने सांगितलं, ‘या सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स होते. त्यामुळे मी ही सीरिज स्वीकारावी की नाही, असा प्रश्न मला पडला होता. मी बाबांना फोन केला. बाबा, मला ही सीरिज करायला हवी का? असं ती त्यांना विचारलं. यावर हो... हो... अगदी बिनधास्त कर, असं ते मला म्हणाले होते.’
4 / 8
बाबांनी होकार दिल्यावर मी आश्रम साईन केली. प्रकाश झा यांच्यामुळे सीरिज करताना मी कम्फर्टेबल होते. इंटिमेट सीन्स देताना कलाकारांना असुरक्षित वाटू नये, याची पूरेपूर काळजी घेतली होती, असं ती म्हणाली.
5 / 8
मी बिहारची आहे. माझं कुटुंब अतिशय साधं आहे. हे सगळं माझ्यात डोक्यात होतं. पण माझं कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. त्यामुळे मी माझ्या वाट्याला आलेले बोल्ड सीन्स करू शकले, असं ती म्हणाली.
6 / 8
आश्रम या सीरिजनंतर लोक मला कविता याचं नावानं ओळखू लागले आहेत. 2020 मध्ये मी मनालीत गेले होते. तिथे मी मास्क घातलं असतानाही लोकांनी मला ओळखलं. या सीरिजने मला नवी ओळख दिली, असं ती म्हणाली.
7 / 8
बॉबी देओलसोबत काम करण्याचा अनुभवही तिने शेअर केला. बॉबी खूप स्वीट आहे. तो खूप कूल आहे. त्याचा बरसात हा सिनेमा रिलीज झाला होता. तेव्हापासून माझा त्याच्यावर क्रश होता, असंही तिने सांगितलं.
8 / 8
अनुरिता पहिल्यांदा अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये दिसली होती. 2012 साली प्रदर्शित या चित्रपटात तिने विनीत कुमार सिंगच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
टॅग्स :आश्रम चॅप्टर २बॉबी देओलवेबसीरिज