Join us  

ब्रेकअपचा खुलासा केल्यानंतर अंकिता-सुशांतचे जुने Photo व्हायरल, दोघांची गोवा ट्रीप होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 3:58 PM

1 / 8
'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या बिग बॉस 17 मुळे चर्चेत आहे. अंकिताने पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केलाय. आता जिथे अंकिता तिथे सुशांतसिंहचा विषय तर निघणारच.
2 / 8
नुकतंच एका एपिसोडमध्ये अंकिताने सुशांतने तिच्याशी का ब्रेकअप केलं याचा खुलासा केला. २०१६ मध्ये त्यांचं नातं तुटलं. एका रात्रीत गोष्टी बदलल्या. सुशांतला यश मिळत गेलं आणि तो दूर होत गेला असं अंकिता म्हणाली.
3 / 8
दरम्यान अंकिता आणि सुशांत ब्रेकअपआधी गोवा ट्रीपवर गेले होते. त्यांचे तेथील फोटो सोशल मीडियावर आता पुन्हा वेगाने व्हायरल होत आहेत.
4 / 8
सुशांतसोबतचे अंकिताचे हे फोटो पाहून ते दोघंही किती खूश होते हे लक्षात येतं. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय होते. मित्रपरिवारासोबत त्यांनी सुट्ट्यांचा आनंद घेतलेला दिसतोय.
5 / 8
एका फोटोत अंकिताने सुशांतला पकडलं आहे तर सुशांत दिलखुलास हसताना दिसतोय. दोघंही बीचवर एन्जॉय करताना दिसत आहेत.
6 / 8
ही 'पवित्र रिश्ता'च्या संपूर्ण कास्टची ट्रिप होती हे सुद्धा स्पष्ट दिसतंय. कारण मालिकेतील इतर स्टारकास्टही या फोटोंमध्ये दिसत आहेत.
7 / 8
अंकिता आणि सुशांत आपापल्या रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. याच मालिकेच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नंतर ते लिव्ह इन मध्येही राहत होते आणि लग्नही करणार होते.
8 / 8
दरम्यान 2020 मध्ये सुशांतने गळफास घेत आत्महत्या केली. या धक्क्यातून आजही कोणीच सावरु शकलेलं नाही. अंकितालाही याचा जबर धक्का बसला. मात्र तिला पती विकी जैनची साथ मिळाली. सध्या दोघंही बिग बॉसच्या घरात सहभागी झाले आहेत.
टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतव्हायरल फोटोज्