Join us  

"सुशांत खूप चांगला होता, आजही त्याच्या कुटुंबाशी आमचे..."; अंकिता लोखंडेच्या आईचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 6:07 PM

1 / 11
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नातं किती घट्ट होतं याची झलक आजही पाहायला मिळते. याच दरम्यान अंकिताची आई वंदना लोखंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
2 / 11
बिग बॉसमध्ये अंकिता नेहमीच तिच्या आणि सुशांतच्या नात्याबाबत बोलत असते. अंकिताची आई वंदना यांनी सांगितलं की, 'अंकिता 7 वर्षे सुशांतसोबत राहत होती. अशा नात्यातून बाहेर पडणं कठीण आहे.'
3 / 11
'दोघीही नियमितपणे बोलतात. एवढंच नाही तर सुशांतचे वडील देखील अंकिताशी संपर्क साधतात. ते तिला आपल्या मुलीप्रमाणे मानतात.'
4 / 11
'अंकिताचा सुशांतच्या कुटुंबाशी ग्रेट बॉन्ड आहे. हे नातं इतकं घट्ट आहे की सुशांतच्या बहिणी राणी आणि श्वेता आजही तिला कॉल करतात.'
5 / 11
सुशांतची आठवण काढून वंदना म्हणाल्या की, तो खूप चांगला मुलगा होता. अतिशय हुशार. अंकिता आणि सुशांत लिव्ह-इनमध्ये असताना मी त्यांच्यासोबत राहिले आहे.
6 / 11
सुशांतच्या मृत्यूनंतर विकीने अंकिताला खूप सपोर्ट केला आहे. जेव्हा अंकिताला खूप ट्रोल केल जात होतं तेव्हाही तिची साथ दिली असं आईने आपल्या जावयाबाबत म्हटलं आहे.
7 / 11
'विकीने अंकिताला प्रत्येक क्षणाला साथ दिली. आता बिग बॉसमध्ये काहीही दिसत असले तरी विकी तसा नाही, तो नेहमी अंकिताच्या सोबत असेल हे आम्हाला माहीत आहे.'
8 / 11
'विकी हा नेहमी मला माझ्या मुलासारखा आहे. बिग बॉसमध्ये त्याला एका वेगळ्याच पद्धतीने दाखवलं जात आहे. तो अजिबात वाईट नाही. नेहमी साथ देतो' असं अंकिताच्या आईने म्हटलं आहे.
9 / 11
2023 मध्येच अंकिताला बिग बॉसची ऑफर मिळाली होती, पण तिच्या वडिलांच्या निधनामुळे ती सहभागी होऊ शकली नाही. अंकिता आणि विकी बिग बॉसमुळे सतत चर्चेत आहेत.
10 / 11
11 / 11
टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत