Join us

अमृता अरोराच्या बर्थ डे पार्टीत मलाइका अरोरा अन् करिना कपूरचा दिसला जलवा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST

बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा आज ४० वर्षांची झाली असून, नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. ३१ जानेवारी १९८१ ला जन्मलेली अमृता हॉट अभिनेत्री मलाइका अरोराची लहान बहीण आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा आज ४० वर्षांची झाली असून, नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. ३१ जानेवारी १९८१ ला जन्मलेली अमृता हॉट अभिनेत्री मलाइका अरोराची लहान बहीण आहे. अमृताचा ४०वा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी तिच्या फॅमिली मेंबर आणि फ्रेंड सर्कलनी काहीच कमतरता ठेवली नाही.अमृताच्या वाढदिवसासाठी तिचे सर्व फ्रेंड्स प्रायव्हेट प्लेनने मुंबईहून गोव्याला पोहोचले.आदल्या रात्रीच तिच्या वाढदिवसाचे गोव्यात जोरदार सेलिब्रेशन केले.करिना कपूर-खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, मलाइका अरोरा, शकील लडक आदी उपस्थित होते.अमृताच्या फॅमिली सदस्यांबरोबरच सोशलाइट नताशा पूनावाला, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट्ट, सोहेल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूरची पत्नी महीप कपूर, निर्माता रितेश सिधवानीची पत्नी डॉली सिधवानी हेदेखील बर्थ डे पार्टीत सहभागी झाल्या होत्या.अमृताचा पती शकील लडक याने तिचा वाढदिवस अधिक स्पेशल बनविण्याचा प्रयत्न केला.मुंबईहून गोव्याला रवाना होण्याअगोदर सर्व सेलेब्सनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.त्याचबरोबर बर्थडे सेलिब्रेशनचेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.अमृता अरोराने तिच्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून केली.अमृताने ‘आवारा पागल दीवाना, रक्त, स्पीड, गोलमाल रिटन्स, कमबख्त इश्क’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.अमृताने २००९ मध्ये बिझनेसमॅन शकील लडक याच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला अजान आणि रियान नावाची दोन मुले आहेत.अमृता सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. परंतु ती नेहमीच लाइमलाइटमध्ये राहात असते.अमृता करिना कपूर-खानची बेस्ट फ्रेंड आहे. ती नियमितपणे तिच्यासोबत बघावयास मिळत असते.अमृता आपल्या फिगरबद्दल खूपच अलर्ट आहे. ती नियमित जीम जाणे पसंत करते. करिना कपूर-खानबरोबर ती नेहमीच जीमला जात असते. त्याचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करीत असते.