Join us  

राणादा आणि अंजली बाईंचा जीव रंगला! वहिनीसाहेबांनीदेखील दिला ग्रीन सिग्नल, पाहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 1:29 PM

1 / 8
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा आणि अंजली बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा काल साखरपुडा पार पडला.
2 / 8
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र त्यांनी या चर्चेवर मौन सोडले नव्हते.
3 / 8
परंतु, काल अक्षया आणि हार्दिक यांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले.
4 / 8
अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याच्या पोस्टवर चाहते लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इतकेच नाही तर त्यांचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 8
दरम्यान अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याला तुझ्यात जीव रंगला मालिकेतील सहकलाकार वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री कांडगावकर हिनेदेखील हजेरी लावली होती.
6 / 8
धनश्री काडगावकर हिने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले की, आणि आज नंदिता ला राना अंजलीच्या एकत्र येन्याशी काहिच हरकत नाही…..
7 / 8
तसेच यावेळी तुझ्यात जीव रंगला मालिकेतील काही कलाकारांनी या साखरपुड्याला हजेरी लावली होती.
8 / 8
धनश्रीच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीधनश्री काडगावकरतुझ्यात जीव रंगला