Join us  

पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याचा जलवा, स्टायलिश लूकमध्ये 'गोल्डन गर्ल'चा रॅम्प वॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 7:49 PM

1 / 8
विश्वसुंदरी ऐश्वर्या रायचा केवळ भारतातच नाही तर जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात
2 / 8
ऐश्वर्या नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. यावेळी रॅम्पवर तिचा जलवा पहायला मिळाला.
3 / 8
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याने सोनेरी रंगाचा चमचमता गाऊन परिधान केला होता. यात ती कमालीची सुंदर दिसत होती.
4 / 8
ऐश्वर्याने रॅम्प वॉक करताना सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. तिचे रॅम्पवॉकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5 / 8
ऐश्वर्या राय बच्चन आता 50 वर्षांची झाली आहे. त्यातून आजही ती तितकीच सुंदर आणि फिट आहे. तिच्या अभिनयाचेही सर्वचजण फॅन्स आहेत.
6 / 8
ऐश्वर्या ही गोल्डन कलरचा शिमरी गाउन आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. तिने डायमंड रिंग्ज आणि सोनेरी हिल्स घातल्या होत्या.
7 / 8
पॅरिस फॅशन वीकदरम्यान प्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ लॉरियल पॅरिसतर्फे फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
8 / 8
केंडल जेनर, इव्हा लाँजोरिया, अँडी मॅकडॉवेल, हेलेन मिरेन, अजा नाओमी किंग, वोयला डेविस यांच्यासोबतच ऐश्वर्यासुद्धा या फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनपॅरिसबॉलिवूडसेलिब्रिटी