Join us

शॉर्ट ड्रेसमध्ये पार्टीत बघावयास मिळाली ऐश्वर्या राय-बच्चन, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST

काही दिवसांपूर्वीच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परंतु ऐश्वर्या राय-बच्चनचा अंदाज बघण्यासारखा होता. पार्टीत ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनबरोबर शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली होती.

काही दिवसांपूर्वीच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परंतु ऐश्वर्या राय-बच्चनचा अंदाज बघण्यासारखा होता. पार्टीत ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनबरोबर शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली होती. ऐश्वर्याने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.पार्टीत ती मनीष मल्होत्राची गळाभेट घेताना अन् किस करताना बघावयास मिळाली.यावेळी अभिषेक आणि दिग्दर्शक करण जोहरही कॅज्युअल लूकमध्ये बघावयास मिळाले.सध्या ऐश्वर्या तिच्या आगामी ‘फन्ने खां’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता अनिल कपूरबरोबर झळकणार आहे.विश्वसुंदरीचा ताज मिळविलेल्या ऐश्वर्याचे सौंदर्य आजही तेवढेच आकर्षित करणारे आहे.बºयाच काळानंतर ऐश्वर्या एवढ्या बिनधास्त अंदाजात बघावयास मिळाली.