आयुषमान खुराणाचा डॅशिंग अंदाज पाहाच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST
आयुषमान खुराणाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही एँकर आणि व्हिडिओ जॉकी म्हणून केली. विक्की डोनर या चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच त्यांना प्रेक्षकांचे लक्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर वेधून घेतले. त्यानंतर त्यांने केलेला प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट गेला.
आयुषमान खुराणाचा डॅशिंग अंदाज पाहाच !
आयुषमान खुराणाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही एँकर आणि व्हिडिओ जॉकी म्हणून केली. विक्की डोनर या चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच त्यांना प्रेक्षकांचे लक्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर वेधून घेतले. त्यानंतर त्यांने केलेला प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट गेला. कॉलेजच्या दिवसांमध्ये आयुषमानने थिएटरमध्ये सुद्धा काम केले आहे. जवळपास पाच वर्ष आयुषमानाने नाटकांमध्ये काम केली. बरेली की बर्फी' आणि 'शुभ मंगल सावधान' हे दोन्ही चित्रपट आयुषमानने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या. विक्की डोनरमध्ये अभिनयासोबत गाणे देखील गायले होते. तो एका चांगल्या अभिनेत्यासोबत गायक देखील आहे. आयुषमानने नुकताच आपला 33वा वाढदिवस साजरा केला. त्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी ट्वीटरवर शुभेच्छा दिल्या. आयुषमान खुराणाने 'एमटीव्ही रोडीज' सीजन 2 जिंकले होते आणि हाच त्याच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला. यानंतर आयुषमान प्रकाशझोतात आला.