Aindrila Sharma : कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर मल्टीपल कार्डियक अरेस्ट; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री व्हेंटिलेटरवर, प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 11:29 IST
1 / 8बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मल्टीपल कार्डियक अरेस्टनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. कार्डियक अरेस्ट इतका गंभीर होता की तिला अनेक वेळा सीपीआर द्यावा लागला. 2 / 8सध्या एंड्रिलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अभिनेत्रीला यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीवर शस्त्रक्रियाही करावी लागली. एंड्रिलाची प्रकृती इतकी गंभीर आहे की, अभिनेत्री आता मृत्यूशी झुंज देत आहे. 3 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीला अनेकदा हृदयविकाराचा झटका आला आहे. अनेक हृदयविकाराच्या झटक्यांमुळे अभिनेत्रीची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक आहे. ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सर्वजण अभिनेत्रीच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.4 / 8काही दिवसांपूर्वी एंड्रिलाला स्ट्रोक आला होता. तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या (ब्लड क्लॉट्स) जमा झाल्या आहेत. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा देखील एंड्रिलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि त्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते.5 / 8एंड्रिलाने याआधी दोनदा कॅन्सरशी सामना केला आणि तो लढा जिंकला आहे. यानंतर आता ती पुन्हा व्हेंटिलेटर असल्याच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीची आता प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब आणि चाहते अतिशय दुःखी आहे. मित्र-मैत्रिणी आणि चाहते ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.6 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार, याआधी देखील एंड्रिला शर्माची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. एंड्रिलाची अचानक प्रकृती बिघडली होती. तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या असून अभिनेत्री व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगण्यात आले होते.7 / 8एंड्रिला शर्माने यापूर्वी दोनदा कॅन्सरशी लढाई जिंकली आहे. दुसऱ्यांदा कॅन्सरशी लढा जिंकून तिने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. अभिनेत्रीवर गंभीर शस्त्रक्रियाही झाली आहे. तिने किमोथेरपी देखील घेतली आहे आणि ती केल्यानंतर तिला डॉक्टरांनी कॅन्सरमुक्त घोषित केले आहे. 8 / 8एंड्रिलाने दोन ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. 'झुमुर' या टीव्ही शोमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले. Jibon Jyoti, ‘Jiyon Kathi’ मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - सोशल मीडिया)